TRENDING:

Mutton : दुकानात सहज मागता मटण चाप; पण असतं काय, मटणाचा कोणता भाग, लोक इतका आवडीने का खातात?

Last Updated:
Mutton Chops : मटण शॉपमध्ये गेलात की दुकानदाराला तुम्ही मटण चाप द्या असं सांगता. मटणाचे बरेच भाग आहेत, ज्याची वेगवेगळी नावं आहे. त्यात चाप सगळ्यात प्रसिद्ध. म्हणजे कुणाला मटणाच्या भागाची नावं माहिती नसतील किंवा काय घ्यायचं ते सुचत नसेल तर पटकन तोंडात चाप येतं आणि लोक तेच खरेदी करतात. पण हा चाप म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का? 
advertisement
1/5
दुकानात सहज मागता मटण चाप; पण असतं काय, मटणाचा कोणता भाग, लोक आवडीने का खातात?
मटण चाप ज्याला इंग्रजी मटण चॉप्स म्हणतात. जे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. तवा मटण चाप – तव्यावर मसाल्यात परतून बनवलेले. ग्रिल्ड मटण चाप – ओव्हन किंवा कोळशावर भाजलेले. फ्राय मटण चाप – तेलात किंवा तुपात खरपूस तळलेले. मसालेदार मटण चाप करी – थोड्या रस्स्यात शिजवलेले. महाराष्ट्रात मटण चाप सहसा कांदा, आलं-लसूण, लाल तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून बनवले जातात.
advertisement
2/5
मटण चाप फक्त चविष्टच नाहीत, तर पौष्टिकही आहेत. यामध्ये हाय प्रोटिन, आयर्न जे रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. व्हिटॅमिन B12 जे मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक आहे. या घटकांचा समावेश आहे. पण चरबीचं प्रमाण लक्षात घेऊन हे मर्यादित प्रमाणातच खाणं चांगलं.
advertisement
3/5
मटण चाप खास मानलं जाण्याची अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची चव. हाडामुळे मांसात नैसर्गिक स्वाद तयार होतो. शिवाय, चाप पटकन शिजतात आणि योग्य मसाल्यांसह तयार केल्यास अतिशय रुचकर लागतात. म्हणूनच हॉटेल्स, ढाबे आणि खास पार्टी मेनूमध्ये मटण चापला विशेष स्थान असतं.
advertisement
4/5
मटण चाप प्रामुख्याने दोन भागांतून मिळतात. रिब चॉप्स म्हणजे छाती किंवा बरगडीचा भाग जो मऊ, रसदार असतो. तर दुसरा लोइन चॉप्स म्हणजे पाठीचा भाग, हा अधिक नरम आणि चवीला चांगला मानला जातो.  या भागांमध्ये चरबीचं प्रमाण संतुलित असल्यामुळेमांस कोरडं न होता रसदार राहतं.
advertisement
5/5
यामध्ये मांसासोबत हाड असतं. ज्यामुळे शिजवताना त्याला वेगळीच चव आणि सुगंध येतो. चाप हे सहसा सपाट आणि थोडे जाडसर कापलेले असतात, त्यामुळे ते भाजण्यासाठी किंवा तव्यावर शिजवण्यासाठी अतिशय योग्य असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mutton : दुकानात सहज मागता मटण चाप; पण असतं काय, मटणाचा कोणता भाग, लोक इतका आवडीने का खातात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल