मुकूट की केस; भगवान बुद्धांच्या डोक्यावर ते काय? तुम्ही सांगू शकता?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Gautam Buddha Hair Story: भगवान बुद्धांची मूर्ती, फोटो तुम्ही पाहिलेत तर त्यांच्या डोक्यावर गोलगोल अशी डिझाईन दिसते. काहींना वाटतं की ते त्यांचे कुरळे केस आहेत. तर काहींना वाटतं की ते त्यांच्या डोक्यावरील मुकूट आहे. पण प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टी नाहीत.
advertisement
1/5

<a href="https://news18marathi.com/tag/buddha-purnima/">गौतम बुद्धांचे फोटो</a> आणि मूर्ती तुम्ही पाहिल्या असतील. त्यांच्या डोक्यावर छोटेछोटे गोल दिसतात. ज्याचा आकार एखाद्या मुकूटासारखा आहे. काही जण म्हणतात हा मुकूट आहे तर काही जणांना ते त्यांच्या कुरळे केस वाटतात.
advertisement
2/5
पण भगवान बुद्धांच्या डोक्यावर दिसणारे हे छोटेछोटे गोल म्हणजे ना मुकुटाची डिझाईन आहे ना त्यांचे कुरळे केस. त्यांच्या डोक्यावर अशी गोष्ट आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
advertisement
3/5
भगवान बुद्धांच्या डोक्यावर कुरळे केस किंवा मुकूटाची डिझाईन वाटते, ते प्रत्यक्षात गोगलगाय आहे. एकूण 108 गोगलगायी त्यांच्या डोक्यावर आहेत.
advertisement
4/5
असं म्हटलं जातं की एकदा गौतम बुद्ध कडक उन्हात ध्यान करत होते. तेव्हा त्यांच्या डोक्यावर केस नव्हते. तिथून एक गोगलगाय गेली, तिनं बुद्धांना उन्हात साधना करताना पाहिलं.
advertisement
5/5
ही गोगलगाय गौतम बुद्धांच्या डोक्यावर जाऊन बसली. यानंतर आणखी काही गोगलगायी तिथं आल्या आणि त्यासुद्धा भगवान बुद्धांच्या डोक्यावर बसल्या. (सर्व फोटो सौजन्य : Shutterstock)