Air Hostess : एअर हॉस्टेस लाल रंगाची लिपस्टिक का लावतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Air Hostess Red Lipstick : एकेकाळी एअरलाइन्स ग्रुमिंग मानकांचा कठोर भाग असलेली बोल्ड लिपस्टिक शेड अजूनही आकाशात दिसून येतो आणि तो फक्त फॅशनसाठी नाही.
advertisement
1/7

विमानाने प्रवास करताना विमानाच्या दरवाजात आपलं हसतमुखाने स्वागत करतात त्या एअर हॉस्टेस. तुम्ही पाहिलं असेल बहुतेक एअर हॉस्टेस लाल रंगाची लिपस्टिक लावतात. हे फक्त फॅशनसाठी नाही तर त्यामागे एक खास कारण आहे. काही एअर हॉस्टेसने याबाबत सांगितलं आहे.
advertisement
2/7
अमेरिकेतील एका मोठ्या एअरलाइनसाठी 20 वर्षे काम करणारी माजी फ्लाइट अटेंडंट हीदर पूलच्या मते, लाल लिपस्टिक म्हणजे एक प्रकारची सुरक्षा आहे. क्रूझिंग अ‍ॅटिट्यूड : टेल्स ऑफ क्रॅशपॅड्स, क्रू ड्रामा आणि क्रेझी पॅसेंजर्स अॅट 35000 फूट या पुस्तकात तिने याबाबत लिहिलं आहे. .
advertisement
3/7
पूलच्या मते, एअर हॉस्टेस लाल रंगाची लिपस्टिक लावतात जेणेकरून प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत तुमचे ओठ वाचता येतील.
advertisement
4/7
अमेरिकेतील प्रत्येक मोठ्या एअरलाइन्समध्ये काम केलेल्या अनुभवी फ्लाइट अटेंडंट सिडनी अ‍ॅनिसिटाइन म्हणते, मला हे कधीच सांगण्यात आलं नाही, मी इतर कोणत्याही फ्लाइट अटेंडंटने या कारणासाठी लिपस्टिक लावल्याचं ऐकलं नाही. आजकाल, जर तुम्हाला एअर हॉस्टेसचे असे ओठ दिसतील तर ती फक्त एक स्टाईल आहे.
advertisement
5/7
आणखी एक अनुभवी फ्लाइट अटेंडंट आणि ट्रॅव्हल लेखिका क्रिस्टीन एक्स्टीन निझकाही या मताशी सहमत आहेत. फ्लाइट अटेंडंट चमकदार लिपस्टिक लावण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे 'कॉमन फ्लाइट-अटेंडंट लूक,” असं ती म्हणते.
advertisement
6/7
काही एअरलाइन्समध्ये जसं की एमिरेट्समध्ये, लाल लिपस्टिक युनिफॉर्म लूकचा एक भाग असते. एमिरेट्समध्ये एक विशिष्ट मेकअप लूक असतो जो फ्लाइट अटेंडंटना पाळावा लागतो. त्यांना मेकअपचं प्रशिक्षण देखील असतं.
advertisement
7/7
आता लिपस्टिक आपत्कालीन परिस्थितीत कशी मदत करू शकते, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. लाल लिपस्टिकमागील सिद्धांत असा आहे की मोठ्या आवाजात, गोंधळलेल्या आपत्कालीन परिस्थितीत, तुम्हाला फ्लाइट अटेंडंटच्या सूचना ऐकू येणार नाहीत. पण त्यांचे ओठ हालताना दिसतील. एक चमकदार लाल ओठ अशाब्दिक संवादात मदत करू शकते.