TRENDING:

Hill Station : शिमला, मनाली, मसुरी कुठेही जा, सगळ्या हिल स्टेशनवर आहे मॉल रोड, पण का?

Last Updated:
Hill Station Mall Road : जर तुम्ही कधीही शिमला, मसूरी, मनाली किंवा नैनितालसारख्या कोणत्याही हिल स्टेशनला भेट दिली असेल तर तुम्ही एक गोष्ट नक्कच पाहिली असेल, तिथला प्रसिद्ध मॉल रोड.
advertisement
1/7
शिमला, मनाली, मसुरी कुठेही जा, सगळ्या हिल स्टेशनवर आहे मॉल रोड, पण का?
शिमला, मसूरी, मनाली किंवा नैनितालसारख्या हिल स्टेशनवरील मॉल रोड हे रस्ते फक्त बाजारपेठा नाहीत तर एक अनुभव आहेत जो प्रत्येक पर्यटक अनुभवू इच्छितो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या रस्त्यांना मॉल रोड का म्हणतात आणि ही परंपरा कुठून सुरू झाली?
advertisement
2/7
आज आपण मॉलचा अर्थ मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स असा समजतो, पण प्रत्यक्षात मॉल या शब्दाचा अर्थ पूर्वी वेगळाच होता. ब्रिटीश राजवटीत, मॉल हा शब्द विशेषतः चालण्यासाठी आणि सामाजिकीकरणासाठी डिझाइन केलेल्या खुल्या जागेचं वर्णन करण्यासाठी वापरला जात असे.
advertisement
3/7
18व्या आणि 19व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना ब्रिटीश अधिकारी आणि त्यांचं कुटुंब उन्हाळ्याच्या हंगामात डोंगरावर जात असत. दिल्ली आणि कोलकात्याच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी ते शिमला, मसूरी आणि दार्जिलिंगसारख्या हिल स्टेशनवर जात असत.
advertisement
4/7
तिथं एक मुख्य रस्ता बांधण्यात आला होता जिथं लोक संध्याकाळी चालत, गप्पा मारत आणि सामाजिक जीवनाचा आनंद घेत असत. हे रस्ते नंतर मॉल रोड म्हणून ओळखले जाऊ लागले.
advertisement
5/7
कालांतराने हा मॉल रोड सामान्य लोक आणि पर्यटक दोघांनाही आकर्षित करू लागला. स्थानिक हस्तकला, ​​खाद्यपदार्थ, कपडे आणि सजावटीच्या वस्तू इथं उपलब्ध झाल्या. हे रस्ते स्थानिक लोकांसाठी रोजगाराचं साधन आहेत आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक संस्मरणीय अनुभव आहेत.
advertisement
6/7
आज मॉल रोड हे केवळ एक बाजारपेठ नाही तर ते पर्यटन, संस्कृती, इतिहास आणि स्थानिक जीवनशैलीचे मिश्रण आहे. इथं भेट देणं हे कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देण्यापेक्षा कमी नाही. या रस्त्यांचं अस्तित्व आजही आपल्याला ब्रिटिश काळातील सामाजिक रचनेची आठवण करून देते, परंतु आता ते भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग बनले आहेत.
advertisement
7/7
पुढच्या वेळी जर तुम्ही कोणत्याही हिल स्टेशनला गेलात तर तिथल्या मॉल रोडवर नक्कीच फेरफटका मारा. तुम्ही तिथं गेला असाल तर तुमचा अनुभव आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Hill Station : शिमला, मनाली, मसुरी कुठेही जा, सगळ्या हिल स्टेशनवर आहे मॉल रोड, पण का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल