नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून 140 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.आणि आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. या शेवटच्या दिवशी आज उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भोकर मतदारसंघात एकूण 25 उमेदवार रिंगणात आहेत. तर नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत.
जर 15 अधिक नोटा असा एका ईव्हिएम मशीनवर 16 पर्याय असतात. या 16 पैकी जास्त उमेदवार असल्यास अधिक मशिन लागतात. त्यामुळे भोकरमध्ये विधानसभेसाठी दोन तर लोकसभेसाठी दोन अशा एकूण चार ईव्हीएम मशीनवर मतदान होणार आहे.
advertisement
दरम्यान आता उमेदवारांनी घेतलेल्या माघारीवर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही भोकर ची खासियत आहे. जितक्या जोरात अर्ज दाखल केले जातात , तितक्या जोरात माघार देखील घेतली जाते. हे आमच्यासाठी नवीन नाही, आम्हालाही सवय झाली अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
अशोक चव्हाण यांच्या लेकीविरोधातून महाविकास आघाडीतून काँग्रेसने तिरूपती कोंढेकर यांना उमेदवारी दिली आहे. तिरूपती कोंढेकर हे सामान्य कार्यकर्ता आहे.त्यामुळे भोकरमध्ये सामान्य कार्यकर्ता विरूद्द घराणेशाही अशी लढत पाहायला मिळणार आहे.या लढतीत आता कोण बाजी मारतो? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.