महायुती सरकारची महत्त्वकांक्षी 'लाडकी बहीण योजने'चा कार्यक्रम बुलढाण्यात संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, तसेच महायुतीच्या घटकपक्षांतील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेचे वचनपूर्वी कार्यक्रम राज्यातील प्रत्येक शहरात करून महायुती जनतेशी थेट संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
advertisement
वेडी वाकडी विधाने करून आम्हाला अडचणीत आणू नका, अजितदादांनी शिंदे गटाच्या आमदाराचे कान टोचले
आई जिजाऊचा बाणा आमचा, नाद आमचा करू नका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय ठरली. कोट्यवधी महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपयांची ओवाळणी जात आहे. मात्र विरोधकांच्या डोळ्यात ही योजना खुपत आहे. या योजनेच्या विरोधात काँग्रेसवाले न्यायालयात गेले. ही योजना बंद व्हावी, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. पण राज्यातील भगिनींनी विरोधकांना हे सांगणे गरजेचे आहे की सावित्रीच्या लेकी आम्ही पाय आमचा ओढू नका, बंधनातून झालो मुक्त आम्ही, बेडी पुन्हा टाकू नका, पंधराशे रुपयांची ओवाळणी आमची, त्यात खोडा घालू नका, आई जिजाऊचा बाणा आमचा, नाद आमचा करू नका... अशी कविता करून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.
शरद पवार यांचे नाव घेणे टाळले पण लाडक्या बहिणीवरून सुनावले
राज्यातील महिला भगिनींचा योजनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून विरोधकांची पोटदुखी होत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच काल कुणीतरी म्हटले की या योजनेचा फारसा परिणाम निवडणुकीवर होणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
