वेडी वाकडी विधाने करून आम्हाला अडचणीत आणू नका, अजितदादांनी शिंदे गटाच्या आमदाराचे कान टोचले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Buldhana Ladki Bahin Yojna: महायुती सरकारची महत्त्वकांक्षी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम बुलढाण्यात संपन्न होतो आहे.
बुलढाणा : राग आम्हालाही येतो पण व्यक्त होताना जरा मर्यादा पाळणे आवश्यक असते, असा सल्ला देत वेडी वाकडे विधाने करून आम्हाला अडचणीत आणू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांचे कान टोचले.
महायुती सरकारची महत्त्वकांक्षी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम बुलढाण्यात संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, तसेच महायुतीच्या घटकपक्षांतील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती आहे.
advertisement
अजित पवार यांनी संजय गायकवाड यांना खडसावले
काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देईन, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. त्यांच्या विधानावर देशभरातून आक्षेप नोंदविण्यात आले. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची प्रचंड कोंडी झाली. हाच धागा पडडून अजित पवार म्हणाले, वेडी वाकडे विधाने करून कृपया मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मला अडचणीत आणू नका. वाचाळवीरांनी बोलताना जरा मर्यादा पाळणे आवश्यक आहे. भाषा वापरताना थोडी काळजी घ्या. राग आम्हालाही येतो पण व्यक्त होताना जरा मर्यादा पाळणे आवश्यक असते, अशा शब्दात अजित पवार यांनी गायकवाड यांना खडसावले.
advertisement
लाडकी बहीण योजना सुरू राहावी असे वाटत असेल तर महायुतीला मतदान करा
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या भगिनींना आर्थिक संपन्न करत आहोत. त्यांच्या सबलीकरणाचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र ही योजना बंद करण्याचे षडयंत्र विरोधक रचत आहेत. म्हणूनच लाडकी बहीण योजना सुरू राहावी असे वाटत असेल तर महायुतीला मतदान करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. त्याचवेळी विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, असेही अजित पवार यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
advertisement
अजित पवार यांची राहुल गांधींवर टीका
view commentsराहुल गांधी यांची आरक्षण काढण्याची भाषा चुकीची आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनीच फेक नरेटिव्ह पसरविले. मोदींजींच्या नेतृत्वाखालीचे सरकार निवडून आले तर आरक्षण काढून घेतले जाईल, असा प्रचार त्यांनीच केला. मात्र आता त्यांच्याच तोंडात आरक्षण काढून घेण्याची भाषा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
September 19, 2024 3:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
वेडी वाकडी विधाने करून आम्हाला अडचणीत आणू नका, अजितदादांनी शिंदे गटाच्या आमदाराचे कान टोचले


