महायुती कुठे कमी पडली?
फडणवीस म्हणाले, की लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत. ते खोटं बोलत होते. मात्र, आपणही गाफील राहिलो. फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लढावं लागलं. सत्य चिरकाळ जिवंत राहतं. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल दुसरी नाही. विरोधकांना खोटं बोलायची चटक लागलीय. विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही? असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
advertisement
तर आपण 200 जागा जिंकू : फडणवीस
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो. लोकसभेत मविआ म्हणे आमचा विजय झाला. मविआ 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली. आपण निर्धार केला तर किमान 20 लाख मते जास्त घेतली तर आपल्या 200 जागा येतील, असा दावा फडणवीस यांनी केला.
वाचा - देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार मुख्यमंत्री! विठ्ठल महाराज शास्त्री यांचं भाकित
आपण सकारात्मकतेने सरकारी योजना जनतेपुढे घेऊन गेलो तर आपला पराभव शक्य नाही. आपण योजनांची माहिती देतो आणि ते सकाळी येऊन काही तरी वेडं वाकडं बोलतील, माध्यमं तेच दाखवतील. आपल्याला सातत्याने चांगलं जनतेसमोर मांडलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत. अशा बेगडी भावांपासून सावध राहावं लागेल. लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
