Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार मुख्यमंत्री! विठ्ठल महाराज शास्त्री यांचं भाकित, म्हणाले...
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
बीड, (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 'मी पुन्हा येईन' अशी घोषणा केली होती. ते पुन्हा आले मात्र महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागलं. अडीच वर्षांनी शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह भाजपला येऊन मिळाले. यावेळी फडणवीस नक्की मुख्यमंत्री होतील असं सर्वांनाच वाटत असताना ऐनवेळी एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित करण्यात आलं. 105 आमदार सोबत असतानाही मुख्यमंत्रीपद मिळालं नसल्याचं शल्य कार्यकर्त्यांसह भाजप नेत्यांनीही बोलून दाखवलं. मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीस नक्की मुख्यमंत्री होतील असं भाकितचं करण्यात आलं आहे.
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असं भाकीत गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच महाराष्ट्रातील लाखो भावीक भक्तांचे श्रद्धास्थान गहिनीनाथ गडाचे महंत यांच्या भविष्यवानिने खळबळ उडाली. ते गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याप्रसंगी मीडियाशी बोलत होते.
advertisement
महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार?
विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या विरोधी बाकावर असलेल्या पक्षांत उभी फूट पडल्यामुळे राजकीय समिकरण बदलले आहे. या दोन्ही पक्षांचा एक-एक गट भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होतोय.
advertisement
वाचा - बच्चू कडूंची 'तिसरी आघाडी'? विदर्भातील नेत्याचं मोठं विधान
राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे महायुती सरकारचं नेतृत्व आहे. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदी आहेत. विधानसभा तोंडावर आली असून तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आमच्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय लढली जाण्याची शक्यता आहे.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
July 06, 2024 7:12 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार मुख्यमंत्री! विठ्ठल महाराज शास्त्री यांचं भाकित, म्हणाले...