TRENDING:

Maharashtra Politics : 'बिना भ्रष्टाचार, नहीं सहकार' संजय राठोडांचा चंद्रकांत पाटलांसमोर सरकारला घरचा आहेर

Last Updated:

Maharashtra Politics : सरकारमधील शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरले असताना महायुतीमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. यापूर्वी भाजप नेते गणेश नाईक यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावरुन सरकारला घरचा आहेर दिला होता. आता शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री संजय राठोड यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'राज्याच्या सहकार क्षेत्रात बिना भ्रष्टाचार, नहीं सहकार' अशी स्थिती आहे, असा गंभीर आरोप जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समक्ष केला. यवतमाळमध्ये सूतगिरणीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
News18
News18
advertisement

काय म्हणाले संजय राठोड?

जसे प्रामाणिक सहकारी संस्थांना सरकार उभारी देण्याचा प्रयत्न करते तसेच बदमाशी करणाऱ्यांसाठी कडक कायदे करावे आणि त्यांना सरकारने दिलेली मदत सरकार जमा करण्याचे धोरण आणावे, अशी मागणी राठोड यांनी केली. एक सूतगिरणी 1991 साली चालू झाली, त्यांनी वेळोवेळी सरकारकडून कोट्यवधींची मदत मिळविली, शेतकरी सभासदांचे भागभांडवल आणि शासनाचे 30 कोटी रुपये घेऊनही सूतगिरणी सुरु केली नाही. आणि पैसेही परत दिले नाही, असा आरोप संजय राठोड यांनी केला. त्यामुळे राज्यातील मंत्र्याने आपल्याच सरकारमधील मंत्रालयाबाबत केलेल्या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली.

advertisement

मराठी बातम्या/Politics/
Maharashtra Politics : 'बिना भ्रष्टाचार, नहीं सहकार' संजय राठोडांचा चंद्रकांत पाटलांसमोर सरकारला घरचा आहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल