अशोक चव्हाण यांचे महाविद्यालयीन मित्र माजी राज्यमंत्री डी. पी सावंत यांनी देखील अशोक चव्हाण यांची साथ सोडली आहे. डी. पी सावंत हे काँगेसकडून दोनवेळा आमदार आणि राज्यमंत्री होते. त्यांनी आता नांदेड उत्तरमधून काँगेसकडे उमेदवारी मागितली आहे.
Maharashtra politics : महाराष्ट्रात 'मविआ'कडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? दिल्लीतून मोठी बातमी!
अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर डी.पी सावंत काँगेस पक्षात सक्रिय नव्हते. त्यांनी पक्ष सोडला नव्हता. मात्र, आपली भूमिकादेखील स्पष्ट केली नव्हती. आता मात्र त्यांनी काँगेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे, हा अशोक चव्हाणांसाठी धक्का मानला जात आहे. याशिवाय अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील, माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख यांच्यासह अनेकांनी आता काँगेसमध्ये प्रवेश केला आहे.
advertisement
काँग्रेस पक्षाने सगळ्या जिल्ह्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या मतदारसंघांतील इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सावंत यांनी मुंबई आणि दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. पक्षासोबतच राहून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.