डोंबिवली: सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ - 143 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. यंदा डोंबिवली पूर्व या मतदारसंघात महायुतीमधील भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण पुन्हा रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना उबाठा गटाकडून दीपेश म्हात्रे मैदानात आहेत. त्यामुळे ही लढत कशी होणार आणि कुणाचं वर्चस्व असणार आहे? याबाबत लोकल18 सोबत बोलताना स्थानिक मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
डोंबिवलीत विकास झाला
सध्या प्रचाराचा धुमाकूळ डोंबिवलीत सुरू आहे. “मी गेले 30 वर्षे डोंबिवलीत राहत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये बऱ्यापैकी डोंबिवलीचा विकास झालेला आहे. रस्त्यांचं काँक्रिटीकरण सुद्धा झालंय. त्यामुळे विकास झालाय असं म्हणता येईल. याचं सर्वाधिक श्रेय हे रवींद्र चव्हाण यांना जातं. डोंबिवलीतील गणपती मंदिर येथे तर अनेक कार्यक्रम होत असतात. याचेही श्रेय त्यांनाच जातं' असे डोंबिवलीकर रहिवाशी असणारे शेखर कुंडू यांनी सांगितलं.
घरबसल्या मतदान कोण करू शकतं? पाहा काय आहेत अटी आणि कशी होणार संपूर्ण प्रक्रिया
लाडकी बहीण योजना प्रभावी ठरेल
“यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिण योजनेचा उपयोग होईल असं वाटतं. डोंबिवलीतील बरीच कामं सध्या जोमाने सुरू आहेत. पाणी, वीज, रस्ते कॉंक्रिटीकरण ही काम पूर्ण झाली नसली, तरीसुद्धा थोड्याफार फरकाने कामांना गती मिळाली आहे. त्यामुळे मला रवींद्र चव्हाण यांची हवा वाटतेय, असं डोंबिवलीकर साधना यांनी सांगितले.
राजकारणावर बोलावं तर कोल्हापूरकरांनी! जनतेचं ‘उत्तर’ काय? तुफान फटकेबाजीचा Video
म्हात्रेंना संधी द्यावी
“डोंबिवलीत रस्त्यांचा आणि पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. डोंबिवली सारख्या शहरामध्ये अजूनही दोन दोन दिवस पाणी येत नाही. यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. या सगळ्यावर उत्तर म्हणून नवा चेहरा म्हणून दीपेश म्हात्रे यांना एक संधी द्यायला आवडेल,” असे डोंबिवलीकर रहिवासी असणाऱ्या मीना जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या डोंबिवलीत काही मतदार रवींद्र चव्हाण यांच्या कामावर खूश आहेत. तर काहींना नवीन चेहरा म्हणून दीपेश म्हात्रेंना संधी द्यायची आहे. काहींच्या दृष्टीने एकतर्फी वाटणाऱ्या सामन्यात दीपेश म्हात्रे रंगत आणणार का? हे मतदानानंतरच समजणार आहे.





