या विशेष गाड्यांमध्ये पुणे ते दानापूर दरम्यान धावणाऱ्या दैनिक विशेष गाडीच्या सर्वाधिक 212 फेऱ्या असणार आहेत. गाडी क्रमांक 01449 ही विशेष गाडी 1 एप्रिल ते 15 जुलै या कालावधीत दररोज पुणे येथून सुटणार आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 01450 ही गाडी 3 एप्रिल ते 17 जुलै या कालावधीत दररोज दानापूर येथून सुटणार आहे. उत्तर भारतात कामानिमित्त किंवा सुट्ट्यांसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
'गॅस कनेक्शन बंद होणार' तुम्हालाही असा कॉल आला तर सावधान, 14 लाखाची फसवणूक
याशिवाय पुणे ते गोरखपूर दरम्यानही दैनिक विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण 60 फेऱ्या होतील. गाडी क्रमांक 01415 ही गाडी 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान दररोज पुणे येथून सुटेल. तर गाडी क्रमांक 01416 ही गाडी 2 एप्रिल ते 1 मे या कालावधीत गोरखपूर येथून पुण्याकडे सुटणार आहे.
पुणे ते नागपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर एकूण 53 फेऱ्या असतील. गाडी क्रमांक 01469 ही गाडी 21 एप्रिल ते 14 जुलै दरम्यान दर मंगळवारी पुणे येथून सुटेल, तर गाडी क्रमांक 01470 ही गाडी 22 एप्रिल ते 15 जुलै दरम्यान दर बुधवारी नागपूर येथून सुटणार आहे. या गाडीच्या एकूण 26 फेऱ्या होतील.
तसेच आणखी एक विशेष गाडी क्रमांक 01457 ही 15 एप्रिल ते 15 जुलै दरम्यान दर बुधवारी पुणे येथून सुटणार असून गाडी क्रमांक 01458 ही 16 एप्रिल ते 16 जुलै दरम्यान दर गुरुवारी नागपूरहून सुटेल. या गाडीच्या एकूण 28 फेऱ्या होणार आहेत.
याशिवाय पुणे ते गाझीपूर सिटी दरम्यान द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे. या मार्गावर एकूण आठ फेऱ्या होतील. गाडी क्रमांक 01431 ही गाडी 17 ते 28 एप्रिल दरम्यान दर मंगळवार आणि शुक्रवार पुणे येथून सुटेल. तर गाडी क्रमांक 01432 ही गाडी 19 ते 30 एप्रिल दरम्यान दर रविवार आणि गुरुवारी गाझीपूर सिटी येथून सुटणार आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना आरक्षण मिळवणे सोपे होणार असून रेल्वेतील गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे. यात्रेकरू, विद्यार्थी तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांसाठी या विशेष गाड्या मोठा दिलासा ठरणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.






