पुणे : येत्या दोन महिन्यात दिवाळीचा सण येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने लाखो नागरिक हे गावी जात असतात. दिवाळीत प्रवाशांची संख्या वाढत असते. रेल्वेचे आरक्षण या काळात फुल्ल होते. या दिवाळीच्या काळात बाहेरगावी, परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये. यासाठी मध्य रेल्वे विभागातून 90 जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
मध्य रेल्वे पुणे विभागातून पुणे-हजरत निजामुद्दीन, नागपूर, दानापूर, गोरखपूर, सावंतवाडी याकडे जाण्यासाठी 90 रेल्वे गाड्या दिवाळी आणि छटपूजेसाठी स्पेशल धावणार आहे, या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
advertisement
दिवाळी आणि छट पूजेसाठी उत्तर भारतात तसेच इतर भागात प्रवासी जात असतात त्यांचा प्रवास चांगला व्हावा, यासाठी स्पेशल रेल्वे चालू करण्यात येत आहे. तर दानापूरसाठी 35 गाड्या असतील तर गोरखपूरसाठी 23, नागपूरसाठी 10, निजामुद्दीनसाठी 2, सावंतवाडीसाठी 4, लातूरसाठी 4, आणि जोधपूरसाठी 4 त्याचप्रमाणे मुंबईसाठी 8 ट्रिप असणार आहे.
दानापूरसाठी गाड्याची मागणी मोठी असते. त्यामुळे 22 ऑक्टोबरला सुरू करुन या स्पेशल गाड्या 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. गोरखपूरसाठी जाणारी जी गाडी आहे, ती 25 ऑक्टोबरला सुरू होऊन 12 नोव्हेंबरपर्यंत असेल. 01415 ही गाडी पुणे-गोरखपूर दररोज चालणार आहे आणि बाकी 2 गाड्या आहेत. त्या शुक्रवार आणि शनिवारी चालणार आहे. त्याचप्रमाणे नागपूरसाठी आठवड्यातून 5 दिवस स्पेशल गाडी सुरू असणार आहे, त्याची सुरुवात 21 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत चालवणार आहे.
राजस्थानातील जोधपूरसाठी गाडी चालणार आहे. त्याची सुरुवात 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत आणि गाडी आठवड्यात 4 दिवस असणार आहे. तर मुंबईसाठी असणारी गाडी ही बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार तीन दिवस असणार आहे. ही गाडी 23 ऑक्टोबरला सुरू होऊन 8 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. सावंतवाडीची गाडी ही 22 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मंगळवार आणि बुधवारी निजामुद्दीन गाडीच्या दोन ट्रिप होणार आहेत. ती 25 आणि 1 तारखेला धावणार आहे. तसेच उर्वरित जी लातूरसाठी ट्रिप आहे ती 18 ऑक्टोबर आणि 8 नोव्हेंबरला धावणार आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कारगिल युद्धाचा देखावा, पुण्यात कुठे पाहता येणार, हे आहे लोकेशन, VIDEO
रिजर्वेशन सिस्टीम राहणार -
आयआरसीटीच्या वेबसाईटवर जाऊन यासाठी रिझर्वेशन करता येणार आहे. 13 सप्टेंबरपासून ही बुकिंग सुरु करण्यात येणार आहे. तर या जादा गाड्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे या म्हणाल्या.