TRENDING:

पुण्यात चक्क सोन्या-चांदीचे मोदक? गणेशोत्सवात चितळेंच्या प्रयोगाची होतेय चर्चा

Last Updated:

पुणेकरांना आता सोने-चांदीचा अर्क असलेले मोदक आपल्या बाप्पा चरणी अर्पण करता येणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 21 सप्टेंबर : गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळे गणेशोत्सवात ‘मोदक’ सगळ्यांच्याच घरी पाहायला मिळतात. बाप्पाला आपण दरवर्षी वेगवेगळे मोदक दाखवत असतो. पण या वर्षी बाप्पासाठी मोदकांची काही वेगळीच मेजवानी असणार आहे. पुणेकरांना आता सोने-चांदीचा अर्क असलेले मोदक आपल्या बाप्पा चरणी अर्पण करता येणार आहेत.
advertisement

कुठं मिळतं आहेत मोदक?

पुण्यातील चितळे बंधू यांच्याकडे प्रथमच हे मोदक पाहिला मिळत आहे. सोन्याचं अर्क लावलेलं मोदक 3680 रुपये किलो आहेत तर चांदीचा अर्क लावलेलं मोदक 1280 रुपये किलो आहेत. याचं बरोबर खवयाचे मोदक, काजू मोदक, चॉकलेट, अंजीर, केशर बदाम, ब्लूबेरी, असे विविध प्रकारचे मोदक या ठिकाणी मिळत आहेत. तसेच दुकानात साधारण पणे 275 प्रकारची मिठाई ही मिळते.

advertisement

विद्येच्या देवतेला 5 हजार पुस्तकांचा नैवेद्य, हटके उपक्रमाचा होणार विद्यार्थ्यांना फायदा

View More

वेगवगेळ्या प्रकारचे मोदक असल्याने पुणेकर पसंती देत आहेत. काही मोदक तयार केले जात आहेत, तर काही मोदक हे ऑर्डर्स प्रमाणे बनवून देखील दिले जात आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या मोदकांना चांगलीच मागणी आहे. यामध्ये सोने-चांदीचा अर्क दिलेले मोदक लोकांच्या पसंतीस पडत आहेत. यामुळे लोक आपल्या बाप्पाला हे आगळे वेगळे मोदक खरेदी करत असल्याच चित्र सध्या पाहिला मिळतंय, असं व्यावसायिक संजय चितळे यांनी सांगितलं.

advertisement

कुठे मिळतील हे मोदक

चितळे बंधू डेक्कन कॉर्नर पुणे

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात चक्क सोन्या-चांदीचे मोदक? गणेशोत्सवात चितळेंच्या प्रयोगाची होतेय चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल