TRENDING:

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे अनेक आजारांवर मोफत शस्त्रक्रिया, जाणून घ्या योजना!

Last Updated:

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक योजना राबवण्यात येत आहेत. दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आरोग्य विभागातील काही योजना सध्या राबवण्यात येत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिनिधी- पूजा सत्यवान पाटील
advertisement

पुणे: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक योजना राबवण्यात येत आहेत. दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आरोग्य विभागातील काही योजना सध्या राबवण्यात येत आहेत. यामध्ये मोफत डायलेसिस, आरोग्य तपासणी, डोळ्यांचे ऑपरेशन तसेच इतर गंभीर आजारांवर सवलतीमध्ये उपचार किंवा आवश्यक असल्यास मोफत उपचार अशा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या योजनांविषयी अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी लोकल18 ला माहिती दिली आहे.

advertisement

महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना सातत्याने राबवण्यात येत आहेत. आता आरोग्य विभागातील काही महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या असून अनेक तपासण्या आणि उपचार विनामूल्य दिले जात आहेत.ट्रस्टतर्फे डोळ्यांची तपासणी व ऑपरेशन, हार्टचे ऑपरेशन, तसेच गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया आणि इतर शस्त्रक्रिया या सवलतीच्या किंवा पूर्णपणे मोफत करण्यात येतात.

advertisement

तसेच कृत्रिम हातपाय बसवण्याचे शिबिर दर 2 महिन्यांनी आयोजित केले जाते. कमी ऐकू येणाऱ्या रुग्णांना कानाचे मशीन मोफत दिल्या जातात. अनेक आजारांवर ट्रस्टतर्फे मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातात.याशिवाय ससून रुग्णालयातील 3200 रुग्णांना दररोज जेवण देण्याची सेवा देखील ट्रस्टकडून केली जाते. सध्या ट्रस्टचा पुण्यातील 250 पेक्षा अधिक हॉस्पिटलशी टायअप असून या माध्यमातून हजारो रुग्णांना मदत केली जात आहे.

advertisement

असा घ्या योजनांचा मोफतमध्ये लाभ...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलटफेर, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या योजनेचा मोफत लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थीने काही आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला तसेच संबंधित आजारासंबंधीचे वैद्यकीय पेपर्स ही कागदपत्रे दगडूशेठ ट्रस्टकडे जमा करावी लागतात. ही कागदपत्रे तपासल्यानंतर ट्रस्टतर्फे लाभार्थीला प्रमाणपत्र देण्यात येते आणि या प्रमाणपत्राच्या माध्यमातून संबंधित रुग्णाला आरोग्य योजनांचा लाभ मिळू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे अनेक आजारांवर मोफत शस्त्रक्रिया, जाणून घ्या योजना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल