पुणे : माणसाच्या जडणघडणीमध्ये पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. वाचन संस्कृती टिकावी, त्या माध्यमातून आपली संस्कृती ही पुढच्या पिढीपर्यंत जावी यासाठी अनेक जण काम करताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे गेली 20 वर्ष झाले. वंदेमातरम संघटनेच्या माध्यमातून अभिनव पुस्तकं दहीहंडी साजरी केली जात आहे. ही दहीहंडी नेमकी कशी साजरी केली जाते, या मागचा उद्देश काय आहे, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
advertisement
पुण्यातील स. प. महाविद्यालय ही दहीहंडी साजरी केली जाते. हे साजर करत असताना ढोलताशाच्या गजरात विद्यार्थीच्या विविध कार्यक्रम सादर करत केली जाते. पुस्तकांची भिंत तयार करत संपूर्ण महाराष्ट्रभर ही दहीहंडी साजरी केली जात आहे. वाचन संस्कृती ही रुजली पाहिजे, हा उद्देश ठेऊन हा उपक्रम राबवला जात आहे.
नाशकात कांद्याने पुन्हा डोळ्यात आणलं पाणी, भाव ऐकूनही तुम्हालाही बसेल धक्का, विक्रेते काय म्हणाले?
आपण पूर्वीचा विचार केला तर दहीहंडी म्हणजे डीजे समोर फक्त नाचणं, असे स्वरुप होते. मात्र, याचे स्वरूप बदलायचे, म्हणून पुस्तकांची भिंत लावत, विचारांची पेरणी करत ही दहीहंडी गेली 20 वर्षांपासून साजरी केली जात आहे.
समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर, पावसाळी पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाण, Photos
वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये दहीहंडी साजरी केली जात आहे. तरुणांचा चांगला प्रतिसाद देखील लाभत आहे. यावर्षी जवळपास 5 हजार पुस्तकांची संख्या आहे. पुस्तके दहीहंडी झाल्यानंतर ग्रामीण भागातील शाळा वाचनालय एखाद्या शाळेमध्ये ग्रंथालय नसेल तर या पुस्तकांच्या माध्यमातून ते ग्रंथालय सुरू करण्याचे काम हे या पुस्तकं दहीहंडीच्या माध्यमातून केल जात आहे, अशी माहिती वंदेमातरम विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लेशपाल जवळगे यांनी दिली आहे.