घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
बिबट्या पहाटेच्या वेळी धानोरीच्या निवासी भागात फिरत असल्याचं फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालं आहे. हे फुटेज समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं असून, त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या दिसल्याची पुष्टी वनविभागाने केली असून, त्यांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.
पहाटेच्या दर्शनानंतर बिबट्या नागरिकांना कुठेही दिसला नाही, ज्यामुळे तो जवळच्या संरक्षण वनक्षेत्रांमधून आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मागील काही वर्षांत निगडी आणि धानोरी परिसरासह सीएमई-बोपखेल, दिघी-डीआरडीओ आणि मुळा नदीकाठच्या भागातही बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यावरुन हे दिसतं, की हा बिबट्यांसाठी एक जोडलेला नैसर्गिक मार्ग आहे.
advertisement
मोठी बातमी: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री, सोसायटीतील CCTV Video, पुणेकर दहशतीत
वनविभागाने मुंजाबावस्ती आणि नजीकच्या लोहगाव तसेच पुणे विमानतळ परिसराच्या हद्दीतही बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप्स लावले आहेत. वनविभागाने बिबट्याचा शोध पूर्ण होईपर्यंत मुंजाबावस्ती आणि आसपासच्या नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही नवीन माहिती किंवा बिबट्याचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यास तातडीने वनविभागाला संपर्क साधण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
औंधमध्येही दिसला बिबट्या
पुणे शहरातील औंध भागातही नुकतंच बिबट्याचं दर्शन झालं होतं. एका सोसायटीच्या आसपास बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री झाल्याची माहिती लगेचच सगळीकडे पसरली. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानिकांना बिबट्या आढळून आल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता धानोरीमधूनही बिबट्याची बातमी समोर आल्याने टेन्शन वाढलं आहे. वन विभागाकडून आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्याच्या शोध सुरू आहे.
