मोठी बातमी: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री, सोसायटीतील CCTV Video, पुणेकर दहशतीत

Last Updated:

Pune Leopard: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानिकांना बिबट्या आढळून आल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

औंधमध्ये बिबट्याचे दर्शन
औंधमध्ये बिबट्याचे दर्शन
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर अशा तालुक्यांतील गावांत बिबट्याच्या दहशतीने शेतकरी वर्ग घराबाहेर पडायला घाबरत असताना आता पुणे शहरातील नागरिकांच्या मनात दहशत बसली आहे. कारण पुणे शहरातील औंध भागात बिबट्याचे दर्शन झाले आहे. पहाटेच्या सुमारास एका सोसायटीच्या आसपास बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानिकांना बिबट्या आढळून आल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाकडून आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्याच्या शोध सुरू आहे.

सोसायटीच्या आसपास पहाटेच्या वेळी बिबट्याचा संचार

औंध भागातील एका सोसायटीच्या आसपास पहाटेच्या वेळी बिबट्याचा संचार सुरू होता. सोसायटीच्या आवारात काही वेळ घालवल्यानंतर पहाटे चार नंतर बिबट्या दिसेनासा झाला. नंतर मात्र बिबट्याच्या कुठल्याही खुणा मिळून न आल्याची माहिती आहे.
advertisement

बिबट्या पकडण्यासाठी रेस्क्यू टीम पाचारण, वन विभागाचे अधिकारी औंधमध्ये

नागरी भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने पुणेकर भयभीत झाले आहेत. बिबट्याचा तत्काळ पकडावे, अशी मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे. वन विभागाने देखील तत्काळ पावले उचलून रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे. थर्मल ड्रोनने बिबट्याचा शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री, सोसायटीतील CCTV Video, पुणेकर दहशतीत
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement