TRENDING:

Pune Job : एअर फोर्सच्या शाळेत नोकरभरती, मिळेल घसघशीत पगार; असा करा अर्ज

Last Updated:

Air Force School Pune Recruitment 2025 : पुण्यातील एअर फोर्सच्या शाळेमध्ये नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. अलीकडेच ही नोकर भरती जाहीर करण्यात आली असून तुम्ही ऑनलाईन, ऑफलाईन किंवा ई- मेलच्या माध्यमातून अर्ज भरू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुण्यातील एअर फोर्सच्या शाळेमध्ये नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. अलीकडेच ही नोकर भरती जाहीर करण्यात आली असून तुम्ही ऑनलाईन, ऑफलाईन किंवा ई- मेलच्या माध्यमातून अर्ज भरू शकता. फक्त एकाच उमेदवारासाठी ही नोकर भरती असून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. पुण्यातील एअर फोर्सच्या शाळेमध्ये ही नोकर भरती केव्हापर्यंत असणार? पात्र उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता किती? वयोमर्यादा किती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया...
Pune Job : एअर फोर्सच्या शाळेत नोकरभरती, मिळेल घसघशीत पगार; असा करा अर्ज
Pune Job : एअर फोर्सच्या शाळेत नोकरभरती, मिळेल घसघशीत पगार; असा करा अर्ज
advertisement

गोकुळच्या सभेत पुन्हा राडा ,महाडिकांचा माईक केला बंद

पुण्यातील हवाई दलाच्या शाळेमध्ये पदव्युत्तर शिक्षक (वाणिज्य) पदासाठी नोकर भरती आहे. ही भरती फक्त एकाच पदासाठी असणार आहे. काही दिवसांपासूनच सुरू झालेली ह्या पदभरतीचा शेवटचा दिवस 23 सप्टेंबर 2025 आहे. एअर फोर्स स्कूल पुणे अंतर्गत "पदव्युत्तर शिक्षक (वाणिज्य)" पदासाठी 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. जर तुम्हाला या नोकरीबाबतीत अधिकाधिक माहिती हवी असेल तर तुम्ही https://www.airforceschoolpune.ac.in/english-vacancies या वेबसाईटवरून अधिकाधिक माहिती मिळवू शकता.

advertisement

कडकनाथ सोडा, बाजारात आलीये चिनी कोंबडी, 40 दिवसांत सोन्याची अंडी, शेतकरी मालामाल

पदव्युत्तर शिक्षक (वाणिज्य) पदासाठी वयोमर्यादा जास्तीत 50 वर्षे असून कमीत कमी 21 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज गुगल फॉर्मच्या माध्यमातून ही भरू शकता. वेबसाईटला गेल्यानंतर Vacancies म्हणून पर्याय आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर, गुगल फॉर्मची लिंक खाली दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. अर्ज केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा ई- मेल आयडीवर पाठवू शकता. अर्जदारांसाठी आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करणे. recruitmentatafsvn@gmail.com या ई-मेलवर तुम्ही तुमचा बायोडाटा पाठवायचा आहे. तुमच्या बायोडाट्यामध्ये जाहीरातीमध्ये असलेल्या सर्व शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.

advertisement

आमच्या घरांवर हातोडा पडला तर स्वतःला जाळून घेऊ, डोंबिवलीत महिलांचा आक्रोश पाहा VIDEO

जर तुम्ही पात्र उमेदवार असाल तर तुम्हाला मुलाखतीसाठी शाळेतून बोलवण्यात येईल. आणखी एका पद्धतीने तुम्ही शाळेमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. "प्राचार्य, वायुसेना शाळा विमान नगर, पुणे – 1" या पत्त्यावर तुम्ही तुमचा अर्ज करू पाठवू शकता. भारत सरकार/ UGC/ AICTE द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून (Accountancy/ Cost Accounting/ Financial Accountancy) पदवी मिळालेले उमेदवार पात्र राहतील. ५० टक्के तुमचे गुण अनिवार्य राहणार आहेत. (Degree M Com किंवा Business Economics पदवी धारक पात्र राहणार नाही) निवड झाल्यानंतर तुम्हाला 35000 ते 60000 इतका पगार असेल.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Job : एअर फोर्सच्या शाळेत नोकरभरती, मिळेल घसघशीत पगार; असा करा अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल