TRENDING:

Ajit Pawar plane Crash Case: अजितदादांच्या विमानात 8.45 वाजता नेमकं काय घडलं? सत्य येणार समोर, ब्लॅक बॉक्सबद्दल मोठी अपडेट

Last Updated:

त्याच दिवशी विमानातील  "ब्लॅक बॉक्स" हा तपास यंत्रणा AAIB अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने ताब्यात घेतला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या अशा प्रकार विमान अपघातात निधन झाल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आणि विरोधकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पण, आता अजितदादांच्या विमानात अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं, पायलटने काय संवाद साधला होता, याची माहिती आता लवकरच समोर येणार आहे, कारण, ब्लॅक बॉक्समधून माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे.
News18
News18
advertisement

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी विरोधकांनी हा घातपात असल्याचा थेट आरोप केला आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी विमानात ५ की ६ माणसं होती, यावरून सखोल चौकशीची मागणी केली आहे. अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास अपघात झाला होता.

त्याच दिवशी विमानातील  "ब्लॅक बॉक्स" हा तपास यंत्रणा AAIB अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने ताब्यात घेतला होता. अखेरीस ६ दिवसानंतर "ब्लॅक बॉक्स" मधील महत्त्वाची माहिती रिक्व्हर करायला सुरुवात झाली आहे.  ब्लॅक बॉक्समधला "डेटा रिकव्हरी" केल्यानंतर नागरी विमान महासंचनालय कडून अहवाल जारी केला जाणार आहे.  या अहवालातून त्या दिवशी विमानात काय घडलं होतं, याची संपूर्ण माहिती समोर येईल.

advertisement

काय असतो ब्लॅक बॉक्स? 

ब्लॅक बॉक्स हे एक उपकरण असून प्रत्येक विमानात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. विमानाच्या मागील भागात ते बसवलेलं असतं. ज्यावेळी विमानात काही अनर्थ घडतो तेव्हा CVR (Cockpit Voice Recorder) पायलटचा आवाज, संभाषण, कॉकपिटचा आवाज रेकॉर्ड करतो. एवढंच नाहीतर  विमानाचा वेग, उंची, इंजिनची माहिती, तांत्रिक डेटा जतन करतो. हीच माहिती नंतर तपासात कामी येत असते.   हा ब्लॅक बॉक्स एका अतिशय खास तंत्राचा वापर करून बनवला असतो, विमानात आग जरी लागली किंवा विमान बुडालं तरी ब्लॅक बॉक्सला काहीही होत नाही. ब्लॅक बॉक्सचा बाह्य भाग टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलने बनवलेला असतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AC चं बिल येईल शुन्य रुपये! 3-4 अंशावर रूम होईल गार, किंमत ऐकून बसेल शॉक!
सर्व पहा

ब्लॅक बॉक्सच्या आत अनेक थर आहेत, ज्यामध्ये इन्सुलेशन, थर्मल प्रोटेक्शन आणि शॉक अॅब्सॉर्बर यांचा समावेश आहे, जे कोणत्याही टक्कर किंवा तापमानापासून आत डेटाचे संरक्षण करतात. ब्लॅक बॉक्समध्ये पाण्याखालील लोकेटर बीकन देखील आहे, जो पाण्यात पडल्यावर सिग्नल पाठवतो. हा सिग्नल सुमारे 30 दिवस टिकतो, जो शोध पथकाला तो शोधण्यास मदत करतो.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar plane Crash Case: अजितदादांच्या विमानात 8.45 वाजता नेमकं काय घडलं? सत्य येणार समोर, ब्लॅक बॉक्सबद्दल मोठी अपडेट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल