TRENDING:

Chakan Traffic Issues : चाकणमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार राबवणार मेगा प्रकल्प; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली अपडेट

Last Updated:

Chakan Traffic Issues : चाकणमधील वाढती वाहतूक कोंडी आणि औद्योगिक परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर ठरला आहे. या समस्येवर राज्य सरकार लवकरच ठोस उपाययोजना राबवणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गांवरील वाढती वाहतूक कोंडी आणि चाकणमधील औद्योगिक कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गेल्या काही वर्षात अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या समस्यांवर राज्य सरकार ठोस उपाययोजना करणाक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. परतीचा पाऊस थांबल्यानंतर या दोन्ही महामार्गांवर रुंदीकरण आणि सुधारणा कामांना वेग दिला जाईल. शिवाय कचरा व्यवस्थापनासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
News18
News18
advertisement

उपमुख्यमंत्री पवार हे चाकण येथील एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यांनी म्हटले की, चाकणमधील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना फक्त दोन ते पाच किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही तासभर ते दीड तास लागू शकतो. हा त्रास नागरिकांनी खूप दिवस सहन केला आहे. त्यामुळे महामार्गांचे रुंदीकरण आणि सुधारणा कामे परतीचा पाऊस उघडल्यानंतर तत्काळ सुरू केली जातील. त्यांनी यावर भर देऊन सांगितले की, निविदा प्रक्रियेला वेग दिला गेला असून काही शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यांसाठी जाणार आहेत. त्यांना योग्य मोबदलाही मिळेल.

advertisement

वाहतूक कोंडी बरोबरच चाकण आणि त्या परिसरातील गावांचा कचरा व्यवस्थापनासाठी औद्योगिक भागात प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील. राज्य सरकारकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. महामार्गाचा विस्तार आणि रस्त्यांच्या सुधारणा कामांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ट्रान्सफॉर्मर आणि लाईट पोल शिफ्ट करण्याचे कामही सुरू आहे. यामुळे पुढील काळात रस्त्यांचे रुंदीकरण वेगाने पार पडून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

advertisement

दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांच्या ताफ्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर महामार्गांवर काही मार्गांवर पोलीसांनी अवजड वाहने थांबवली होती. सकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या या बंदोबस्तामुळे शेकडो दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक ट्रक दीर्घकाळ अडकले. परिणामी नागरिकांचा प्रवास किमान अर्धा ते एक तास उशिरा झाला. रोजच्या वाहतूक कोंडीमुळे आधीच त्रस्त असलेले नागरिक याबाबत नाराज होते आणि प्रत्यक्ष काम करण्याची मागणी करत आहेत.

advertisement

सध्या चाकणमधील वाहतूक कोंडी, कचरा समस्या आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सुरू झालेली ही प्राथमिक कामे नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. लोक आशा व्यक्त करतात की, यावर जलद आणि ठोस उपाययोजना राबवल्या जातील, ज्यामुळे चाकणमधील रहदारीत लक्षणीय सुधारणा होईल.

मराठी बातम्या/पुणे/
Chakan Traffic Issues : चाकणमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार राबवणार मेगा प्रकल्प; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल