अजित पवार यांचा दम कोणाला?
रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेडे वाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात. त्यांना सरळ करण्याची गरज आहे. फक्त आचारसंहिता संपू द्या काही वेडं वाकडं करत असतील तर त्यांना खालून वरून बघून घेऊ असं म्हणत अमोल कोल्हेंचे नाव न घेता रांजणगाव एमआयडीसीत वेडे वाकडं प्रकार करणाऱ्यांना अजित पवारांनी दम भरला. आता याला खासदार अमोल कोल्हे कसं उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
दोन्ही खासदारांनी विकासासाठी निधी आणला नाही : अजित पवार
बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि शिरुरमधुन खासदार अमोल कोल्हे यांना तुम्ही निवडून दिलं. मात्र, दोन्ही खासदारांनी विकासासाठी निधी आणला नसल्याची टीका अजित पवारांनी केली. संसदेत त्यांच्या विरोधात भाषण करताय अन् सांगता आम्हाला निधी मिळत नाही, अशी कारणं देता. पुणे नाशिक रेल्वे, वाहतूक कोंडीचे प्रश्न, मेट्रो रिंग रोड असे प्रश्न सोडवायचे आहे. यासाठी केंद्रात सत्तेत असलेला खासदार निवडून द्यायचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. बारामती मतदारसंघात यंदा मतदान घटल्याचं पाहायला मिळालं. मात्र, बारामतीत मतदान वाढलं आहे. याचा फायदा नक्कीच आमच्या उमेदवाराला होईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
