मला एवढंच सांगायचं आहे. आता जे काही टीव्हीवर सुरू आहे. त्याबद्दलची मला काहीही माहिती नाही. त्या प्रकरणाचा अजित पवार म्हणून काहीही संबंध नाही. मला ३५ वर्षांपासून महाराष्ट्राची जनता ओळखते. त्यासंदर्भात या प्रकरणीची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागे एकदा अशाच प्रकारची माहिती माझ्या कानावर आली होती, त्यावेळी मी स्पष्ट केलं होतं, मला असं अजिबात चालणार नाही. कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणीही करू नये, आता परत काय झालं मला माहिती नाही.
advertisement
त्यामुळे टीव्हीवर ज्या काही बातम्या सुरू आहे, कुणी परवानगी दिली, जमिनीची माहिती काय आहे, मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या कोणत्याही नातेवाईकांच्या संदर्भामध्ये एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही. उलट मी महाराष्ट्राच्या जनतेला आणि अधिकाऱ्याला सांगतोय, माझ्या नावाचा वावर करून कुणी नियमात बसत नसेल असं काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नाही. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा मी कार्यकर्ता आहे.
'चौकशी नक्की करावी'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. जरूर या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. शहानिशा केली पाहिजे, हे सगळं पाहणं सरकारचं कााम आहे. मी या प्रकरणाची सगळी माहिती घेतोय. काय प्रकरण आहे, कागदपत्र कुणी दिली, परवानगी कुणी दिली. उद्या संध्याकाळी याची सगळी माहिती घेऊन बोलणार आहे. एवढंच कानावर आलं आहे, कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका असं सांगितलं. मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करतोय, सगळ्यांनी नियमाला धरून काम केलं पाहिजे. नियम सोडून काम केलं पाहिजे नाही' असंही अजितदादा म्हणाले.
पत्रकारांनी या जमीन व्यवहारात तुमच्या घराचा पत्ता आहे, असं विचारलं असतात अजितदादा म्हणाले की, 'तो बंगला माझ्या नावावर नाही. पार्थ अजित पवार यांच्या नावावर तो बंगला आहे. तो पत्ता तिथला असून त्याचा आहे, असं म्हणत पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारात समोर आलेल्या पत्त्यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं.
'मूल मोठी होतात ती त्यांचा व्यवसाय करतात'
'महार वतनाची जमीन आहे का याची माहिती घेतोय. माझा या प्रकरणाचा दूरपर्यंत संबंध नाही. मी कुणाला मदत करावी अशी कधीही भूमिका घेतली नाही. मूल मोठी होतात ती त्यांचा व्यवसाय करतात. मी संविधानाला मानणारा माणूस, मी कायद्याने चालणारा माणूस आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा मी कार्यकर्ता आहे, असंही अजितदादा म्हणाले.
