आर्यन देव नीखरा असं या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचं नाव असून cringistaan2 या नावाने त्यांचं इन्टाग्रामवर अकाउंट आहे. त्याने पुणे अपघात प्रकरणाशी संबंधित 2 व्हिडीओ बनवले होते. या रॅप साँगमुळे लोकांमध्ये आणखी चीड निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी हा व्हिडीओ आरोपीचा नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच अल्पवयीन आरोपीच्या आईनेही हा तिचा मुलगा नसल्याचं जाहीर करावं लागलं होतं. आर्यनविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 509, 294 ब या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्यन नीखराने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करून प्रशासनावरील संताप व्यक्त केला आहे. “मूळ प्रकरणावरून सर्वांचं लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे”, असं आर्यनने म्हटलं आहे. “मी कोणालाही शिवीगाळ केली नव्हती, मी एक मध्यवर्गीय घरातील माणूस असल्यामुळे माझ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे”, असंही तो म्हणाला.
वाचा - Porsche कार आजोबांकडून बड्डे गिफ्ट; अल्पवयीन नातवाने Whatsappला शेअर केलेला फोटो
काय आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण?
पुण्यात 19 मेच्या रात्री कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने 2 आयटी इंजिनिअर तरुणांना चिरडलं होतं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक मुलगा तर दुसरी मुलगी होती. या प्रकरणामधील बिल्डरच्या मुलाला 14 दिवस बाल कारागृहात ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल आणि अपघात झाला त्यावेळी गाडीत असलेला ड्रायव्हर यांची एकत्र चौकशी होणार आहे.