50,66,199 रुपये गोठवले
आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तपास करत असताना आरोपींची एकूण 27 बँक खाती फ्रीज करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 50,66,199 रुपये गोठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली ही रक्कम आरोपींच्या घरझडतीतून मिळालेल्या मालमत्तेव्यतिरिक्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी आरोपींच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये टोळीतील सर्व सदस्यांचा समावेश आहे.
advertisement
सोनालीसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 13 जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोमकर खून प्रकरणात आंदेकरला पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
13 जणं कोण?
दरम्यान, आयुष कोमकर याची सोनाली आणि प्रियंका आंदेकर मामी आहे. सोनाली वनराज आंदेकर हिच्यासह प्रियंका कृष्णराज आंदेकर, माया देवळे, येल्लबाबाई कित्तुरकर, लक्ष्मीबाई बेडगिरी, संगीता शिंदे, शारदा साळुंखे, बेबी दोडके, सरुबाई निसारे, कल्पना शिंदे, पूजा शिंदे, स्वाती दोडके, मोहन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.