उद्या असणाऱ्या ह्या स्पर्धेमुळे पुण्यातील खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 'पुणे शहर वाहतूक पोलीस' या एक्स अकाऊंटवरून नागरिकांना कोणकोणत्या रस्त्यांवर वाहतूक बंद असेल आणि पर्यायी मार्ग कोणते? याबद्दलची माहिती दिली आहे. पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद असणार आहे. लेडीज क्लबपासून सायकलिंग स्पर्धेला सुरूवात होणार आहे. यामुळे ब्लू नाईट हॉटेल परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चौक पर्यंतचा मार्ग बंद असणार आहे. तर, कोयाजी रोड मार्ग ते एम.जी.रोड मार्ग पर्यंत तुम्ही पर्यायी मार्ग म्हणून वापर करू शकता.
advertisement
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते गोळीबार मैदान चौक या रस्त्यादम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते खाण्या मारुती चौक (एम.जी रोड) ते सोलापुर बाजार चौकी चौक (नेपियर रोड) ते गोळाबार मैदान चौक पर्यंतचा रस्ता बंद असणार आहे. भैरोबा नाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौक मार्गे धोबीघाट चौक, डायसप्लॉट चौक, गिरीधरभवन चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतुक बंद राहील. वाहतुक सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ चौक, गंगाधाम चौक मार्गे जाईल. तर, गोळाबार मैदान चौक ते शितल पेट्रोल पंप चौक या रस्त्यादरम्यान, गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक ते ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप हा मार्ग बंद असणार आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग, 1) मंम्मादेवी चौक, भैरोबानाला, लुल्लानगर, गंगाधाम, सेव्हन लव्हज, 2) शितल पेट्रोल पंप, गंगा सेटेलाईट सोसायटी, कौसरबाग, नेताजी नगर, लुल्लानगर मार्गे... 3) सेव्हन लव्हज गंगाधाम लुल्लानगर चौक (ब्रिज खालुन) मार्गे हा असणार आहे.
शितल पेट्रोल पंप ते खडीमशिन चौक हा मार्ग सुद्धा बंद असणार आहे. याला पर्यायी मार्ग 1) कान्हा हॉटेल/ मिठानगर आईमाता मंदिर, गंगाधाम चौक लुल्लानगर मार्ग, 2) मंतरवाडी कडून येणाऱ्या वाहनांकरीता कान्हा हॉटेल गंगाधाम चौक- लुल्लानगर चौक मैरोबानाला चौक, 3) आश्रम रोड एनआयबीएम रोड- गंगासेटेलाईट सोसा नेताजी नगर लुल्लानगर मार्गे... असा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. खडीमशिन चौक ते ट्रिनिटी कॉलेज ते बोपदेव घाट हा मार्ग सुद्धा बंद असणार आहे. याला पर्यायी मार्ग, श्रीराम चौक- येवलेवाडी पर्यंत, धर्मावत पेट्रोलपंप- येवलेवाडी पर्यंत, हडपसर- सासवड- बोपदेव घाट, कात्रज- शिंदेवाडी- बोपदेव घाट हा पर्यायी मार्ग असणार आहे. खडकवासला ते किरकीटवाडी मार्गावर खडकवासला- सिंहगड रोड- किरकीटवाडी हा मार्ग सुद्धा बंद असणार आहे. याला पर्यायी मार्ग, पानशेत रोड मार्गे असणार आहे. नांदेड सिटी गेटवर येण्यासाठी वारजे ब्रिज ते नांदेड सिटी हा मार्ग बंद असणार आहे. या मार्गाला कोणताही पर्यायी मार्ग नसेल.
'बजाज पुणे ग्रँड टूर' ही सायकल स्पर्धा 109.15 किमी इतक्या अंतरावर पार पडणार आहे. इतरत्र कोणकोणते मार्ग बंद असणार याची माहिती पुणेकरांना 'पुणे शहर वाहतूक पोलीस' या एक्स अकाऊंटवरून मिळेल. ही स्पर्धा फक्त पुण्यापुरती सीमित नसून संपूर्ण देशासाठी महत्त्वाची मानली जाते. पुण्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही नागरिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी येतात.
