वीरेंद्र सिन्हा हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील मोलशी तालुक्यातील मनकापूर येथील रहिवासी होते. ते बाणेर येथील एका आयटी कंपनीत नोकरी करत होते. त्यांचा वाढदिवस असल्याने बुधवारी त्यांनी पुण्यातील आपले नातेवाईक आणि मित्रांसोबत केक कापून साजरा केला होता. त्यानंतर ते लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे गेले होते.
बायकोला शेवटचा मेसेज काय पाठवला?
गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी आपल्या मोबाईलवरून पत्नी रिया सिन्हा यांना संदेश पाठवला. त्यामध्ये, “आय लव you रिया… कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू. माझी गाडी लोणावळ्यात टायगर पॉइंट येथे आहे. गाडीची चावी पुढील टायरखाली आहे व मोबाईल समोरील कॅबिनेटमध्ये आहे,” असा उल्लेख होता. हा संदेश पाहून रिया यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
advertisement
मृतदेह कुठे सापडला?
पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिवदुर्ग मित्र बचाव पथकाच्या मदतीने मोठ्या शोध मोहिमेनंतर वीरेंद्र सिन्हा यांचा मृतदेह दरीत सापडला. ही शोधमोहीम सायंकाळी साडेचारच्या सुमारास यशस्वी झाली. तपास उपनिरीक्षक सागर अर्गडे तपास करत आहेत.
दोन महिन्यांत टायगर पॉइंट परिसरात तिसरी घटना
पोलिस तपासात वीरेंद्र यांच्या मोबाईलमधून काही व्हिडिओ आणि संदेश आढळले असून, त्यामध्ये कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापक प्रीती शर्मा व जयदीप नंदा यांच्यामुळे मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख आहे. यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत टायगर पॉइंट परिसरात आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
