मध्यरात्रीच्या भयाण शांततेत त्या भीषण अपघाताच्या आवाजाने उडवली गावाची झोप; चिमुकलीसह कुटुंबातील तिघांचा मृत्यू
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मध्यरात्रीच्या शांततेत झालेल्या या अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर-न्हावरे चौफुला रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास काळाने भीषण घाला घातला आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे येथील काळे कुटुंब आपल्या खासगी कारने प्रवास करत असताना नलगे वस्तीजवळ त्यांच्या वाहनाचा आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून काळे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण निमोणे गावासह शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या भीषण दुर्घटनेत ३८ वर्षीय पवन राजहंस काळे, त्यांचे मेहुणे ३८ वर्षीय बाळासाहेब नागवडे आणि पवन यांची ९ वर्षांची चिमुकली मुलगी आराध्या पवन काळे या तिघांचा जागीच करुण अंत झाला. मध्यरात्रीच्या शांततेत झालेल्या या अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. कार आणि ट्रकची धडक इतकी जोरात होती की मृतदेह बाहेर काढताना उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
advertisement
या अपघातात कुटुंबातील एक सदस्य गंभीर जखमी झाला असून, त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. निमोणे गावातील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा असा अचानक मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे शिरूर-न्हावरे रस्त्यावरील सुरक्षेचा आणि जड वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 1:29 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मध्यरात्रीच्या भयाण शांततेत त्या भीषण अपघाताच्या आवाजाने उडवली गावाची झोप; चिमुकलीसह कुटुंबातील तिघांचा मृत्यू







