बारामती : बारामतीत टाटा हॅरीअरच्या भीषण अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले असून एकाचा प्रकृती गंभीर आहे. बारामतीत भिगवण रोडवर हा अपघात मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात गाडी उलटी झाल्याचं दिसून येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चौघे शिकाऊ विमान पायलट हे टाटा हॅरीअर गाडीने बारामतीकडून भिगवणकडे जात होते. गाडी रस्त्याच्या कडेला उलटली आहे. या गाडीतून चौघे जण प्रवास करत होते. यात तिघे तरुण तर एक तरुणी होती. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
अपघात एवढा भीषण झाला की, दोन पायलट जागीच ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर आहे. या शिकाऊ पायलट मध्ये एक बिहार, एक दिल्ली, राजस्थानची एक मुलगी व महाराष्ट्राचा एक मुलगा असे सर्वजण प्रवास करीत होते.
अपघात नेमका कशाने झाला याची माहिती अध्याप मिळाली नसून यातील गंभीर जखमींना भिगवण येथील खाजगी दवाखान्यात तातडीने उपचारासाठी आणण्यात आले आहे. अपघात मध्यरात्री घडल्याने अधिकची माहिती मिळाली नाही.
