TRENDING:

'सायलीचा गळा चिरला, बॉडीही आणता आली नाही', बारामतीच्या विवाहितेचा पतीकडून खून, कुटुंबाचा आक्रोश

Last Updated:

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील विवाहित महिला सायली जाधव हिची कर्नाटक राज्यातील कलबुर्गी इथं निर्घृण हत्या करण्यात आली. यावर तिच्या कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील विवाहित महिला सायली जाधव हिची कर्नाटक राज्यातील कलबुर्गी इथं निर्घृण हत्या करण्यात आली. पती अक्षय जाधव याने देवदर्शनाच्या बहाण्याने घेऊन जात तिचा गळा चिरला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सायलीच्या अंगावर कार घालून तिला चिरडलं. ही घटना उघडकीस येताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी पतीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
baramati sayali jadhav murder case
baramati sayali jadhav murder case
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय जाधव याने सायलीला गाणगापूर (कर्नाटक) येथे देवदर्शनाला जाण्याचं असल्याचं सांगून घराबाहेर नेलं होतं. २५ मार्च रोजी प्रवासादरम्यान, चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेल्यानंतर अक्षयने भररस्त्यात गाडी थांबवली आणि सायलीला जबरदस्तीने बाहेर ओढलं. त्यानंतर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

advertisement

मारहाणीनंतरही अक्षयचा राग शांत झाला नाही. त्याने धारदार शस्त्राने सायलीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सायलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने किंवा तिला पूर्णपणे संपवण्यासाठी त्याने अंगावरून कारही घातली. या भीषण घटनेत सायलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा एक हृदयद्रावक व्हिडिओही सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. यावर आता कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

advertisement

सायलीला पैशांसाठी वारंवार त्रास

“आमच्या मुलीला तिचा पती पैशासाठी वारंवार त्रास देत होता. घर बांधणे आणि वाहन खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता. यासाठी तो तिला मारहाण करत असे” असा आरोप सायलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आम्हाला सायलीची बॉडीही आणता आली नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
18 तीर्थांनी समृद्ध महाराष्ट्रातील गाव, देवांचा वाडा म्हणून आहे ओळख, जपलीये ऐतिहासिक परंपरा, Video
सर्व पहा

सायलीची आत्या रोहिणी यांनी सांगितलं की, १५ दिवसात अक्षयने तिची वाट लावली, १६ व्या दिवशी आळंदीला लव्ह मॅरेज केलं. आम्हाला माहितीही नव्हतं. तिच्यावर पैशासाठी सतत दबाव टाकायचा. सायलीवर नाही नाही ते आळ लावले. घटनेच्या आदल्या दिवशी त्याने मला फोन केला. मला म्हणाला की तिला सांगा, भांडणं विसरुन परत येण्यासाठी. नंतर काय बोलणं झालं माहिती नाही, पण बँकेत जाते म्हणून ती गेली. गुरुवारी चार वाजता त्याने सायलीला मारली. आम्हाला बॉडीही आणता आली नाही. मला तिला हातही लावता आला नाही, इतकी मी कमनशिबी ठरले, असं आत्याने सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
'सायलीचा गळा चिरला, बॉडीही आणता आली नाही', बारामतीच्या विवाहितेचा पतीकडून खून, कुटुंबाचा आक्रोश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल