पुणे: स्वतः महादेवाचा अवतार असल्याचे सांगत एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो पसार झाला होता. पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकांसह मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याला आज न्यायालयात सादर केले त्यावेळी त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
महिलेच्या लैंगिक छळाप्रकरणी ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात पुण्यात करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टात हजर केल्यानंतर पुणे पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. तपासासाठी आरोपीचा मोबाईल, व्हिडीओ, फोटो आणि चॅटिंगची माहिती महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यानंतर कोर्टाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, , आरोपीने स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपीने इतर महिलांनाही फसवले आहे का, याचाही तपास करायचा असल्याने सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे. आरोपीने जे व्हिडीओ काढले आहेत ते कुठे सोशल मीडियामध्ये दिले आहे का याचा तपास देखील पोलिसांना करायचा आहे. आरोपी कोणाला पुणे आणि वसई येथे गेल्याची माहिती माहिती समोर आली असून तो इतर कुठल्या ठिकाणी गेला होता का, याचाही तपास केला जाणार आहे. तसेच काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत का, याचाही शोध घेण्यात येणार आहे.
काय म्हणाले आरोपीचे वकील?
तर आरोपीच्या वतीने कोर्टात बाजू मांडताना त्याचे वकील म्हणाले, फिर्याजी महिलेने वैद्यला फेसबुकवर स्वत: रिक्वेस्ट पाठवली होती. आरोपीने लैंगिक अत्याचार केला नाही. महिला स्वत:च्या मर्जीने आरोपीसोबत गेली होती. मोबाईल सगळे घेतले आहे. या संदर्भातील मेसेज दोघांच्याही मोबाईलवर आहे. जर फिर्यादी महिलेने लॉजवर गेले असे म्हटले आहे तर CCTV चेक करावा, महिला विवाहित असून ती स्वतःहून गेली आहे. आरोपीची धार्मिक पार्श्वभूमी चांगली आहे त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. गुंगीचे औषध देऊन अत्याचार म्हटलं आहे तसे काही नाही, वैद्यला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
वसईचा रहिवासी असलेल्या ऋषिकेशने फेसबुकच्या माध्यमातून पुण्यातील एका विवाहित महिलेशी मैत्री केली होती. "ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवतो," असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. डिसेंबर 2023 मध्ये त्याने पुण्यात येऊन महिलेला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आधी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, जी नंतर तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती.
