सुरुवातीच्या 45 मिनिटांच्या कलांमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि महापालिका निवडणूक लढवत असलेले प्रशांत जगताप पिछाडीवर असल्याचे कळते. वानवडी भागात प्रशांत जगताप यांचे वर्चस्व आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते वानवडी भागांतून निवडून येतात. परंतु दोन्ही राष्ट्रवादी जवळ येत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची साथ सोडली होती. काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी महापालिकेचे तिकीट मिळवले.
advertisement
दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर शहरवासीयांना आपला कौल देण्याची संधी मिळाली आहे. शहरातील ४१ प्रभागांमधून एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. या निवडणुकीत चौरंगी सामना रंगला होता. महायुतीतील तीन पक्ष वेगळे लढत असल्याने स्पर्धा तीव्र झाली होती. अशातच आता कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार? असा सवाल विचारला जात आहे.
