TRENDING:

विमानाचे नियम बदलले, प्राणीप्रेमींना मोठा दिलासा, आता एकाचवेळी नेता येणार इतके प्राणी

Last Updated:

Increased In Cabin Pet Allowance : अकासा एअरलाइन्सने प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता प्रवाशांना त्यांच्या विमान प्रवासात दोन पाळीव प्राणी केबिनमध्ये नेण्याची परवानगी मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विमान प्रवासात पाळीव प्राणी घेऊन जाणे हे पूर्वी प्रवाशांसाठी मोठे आव्हान असे. पूर्वी एखादा प्रवासी पाळीव प्राणी घेऊन प्रवास करू शकत होता. परंतु, दोन पाळीव प्राण्यांना विमानात घेऊन जाण्यास परवानगी नव्हती. प्रवाशांसाठी हा एक मर्यादित पर्याय असल्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागायचा. परंतु, आता अकासा एअरने आपल्या पेट्स ऑन अकासा या सेवेत बदल करून प्रवाशांना मोठी सुविधा दिली आहे. यानुसार, आता प्रवाशांना केबिनमध्ये दोन पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्याची परवानगी आहे. जे प्रवाशांसाठी आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी एक आनंदाची बातमी ठरली आहे.
News18
News18
advertisement

एअरलाइनने या सेवेत सुधारणा करून प्रवाशांना आणि त्यांच्या प्राण्यांना सर्वोत्तम सुविधा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून हा बदल करण्यात आला असून सर्व प्रवाशांना समावेशक आणि आरामदायी प्रवास अनुभव देण्याची कंपनीची प्रतिज्ञा स्पष्ट होते. यापूर्वी पाळीव प्राण्यांसाठी बुकिंगची मर्यादा 48 तास होती; आता प्रवाशांना उड्डाणापूर्वी फक्त 24 तास आधी बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या बदलामुळे प्रवाशांना अधिक लवकर आणि सोयीस्कर बुकिंग करण्याची संधी मिळते.

advertisement

या नव्या सुविधेला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. लाँच झाल्यापासून आतापर्यंत 8,500 हून अधिक पाळीव प्राणी या सेवेद्वारे प्रवास करू शकले आहेत. ''पेट्स ऑन अकासा'' सेवा मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी, अयोध्या, श्री विजयपुरम, गुवाहाटी, गोवा, कोची, पुणे, भुवनेश्वर, ग्वाल्हेर, प्रयागराज, श्रीनगर, बागडोगरा, कोझिकोड, दरभंगा, आणि आगरतळा अशा अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे.

advertisement

पाळीव प्राण्यांच्या प्रवासाच्या सुविधांमध्ये अलीकडेच अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या अभिप्रायावर लक्ष ठेवून, अकासा एअरने मे 2024 मध्ये काही महत्त्वाचे बदल केले. यामध्ये पहिला बदल म्हणजे केबिनमध्ये घेऊन जाणाऱ्या पाळीव प्राण्यांचे कमाल वजन 10 किलोग्रॅम (कंटेनरसह) पर्यंत वाढवले गेले. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्राण्यांसह प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. दुसरा बदल म्हणजे पाळीव प्राण्यांच्या प्रवास प्रमाणपत्रांची वैधता आता 15 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे अधिक काळ उपयोगात आणता येतात.

advertisement

अकासा एअरची ही सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी विशेष बनवण्यात आली आहे. कंपनीच्या या प्रयत्नामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायी होण्यास मदत झाली आहे. प्रवाशांना आता त्यांच्या पाळीव प्राण्यांसह प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही आणि विमान प्रवासाचा अनुभव अधिक समृद्ध होईल.

मराठी बातम्या/पुणे/
विमानाचे नियम बदलले, प्राणीप्रेमींना मोठा दिलासा, आता एकाचवेळी नेता येणार इतके प्राणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल