पुणे-गोरख-पुणे आणि पुणे-दानापूर-पुणे या दोन्ही गाड्यांचा कालावधी एक महिन्याने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांच्या प्रत्येकी 44 फेऱ्या अतिरिक्त होतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
कोकणवासीयांसाठी रेल्वेची मोठी भेट; धावणार विशेष रेल्वे; कुठून कुठं जाणार? पाहा थांबे आणि वेळापत्रक
पुण-गोरखपूर 44 अतिरिक्त फेऱ्या
पुणे- गोरखपूर-पुणे दैनिक विशेष गाड्यांच्या एकूण 44 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार ट्रेन क्रमांक 01415 ही विशेष गाडी दि. 10 ते 31 मार्चच्या दरम्यान पुणे येथून दररोज सुटेल. सकाळी 06:50 वाजता ही गाडी गोरखपूरसाठी रवाना होईल. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता तिथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01416 ही विशेष गाडी दि. 11 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान गोरखपूर येथी संध्याकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि पुण्यात तिसऱ्या दिवशी सव्वातीन वाजता पोहोचेल.
advertisement
पुणे-दानापूर ट्रेन
पुणे-दानापूर-पुणे दैनिक विशेष गाडीच्या फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. ही विशेष गाडी देखील 10 ते 31 मार्च दरम्यान पुणे येथून दररोज साडेतीन वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे पोहोचेल. तर दानापूर येथून 12 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान दररोज पहाटे गाडी सुटेल आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.05 वाजता पोहोचेल. रेल्वेचं वेळापत्रक पाहून प्रवाशांनी नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.
