TRENDING:

Leopard Attack : मोटारसायकलचा चक्काचूर, शेतकरी रक्तबंबाळ! नगर-कल्याण मार्गावर बिबट्याचा हल्ला

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत असून मुनष्यांवर हल्ले देखील वाढले आहेत. त्यातच ओतूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली.जिथे नगर-कल्याण महामार्गावरील अहीनवेवाडी फाटा जवळ मोटरसायकलवरून खत घेणाऱ्या शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने झडप घातली. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
leopard hits motorcycle on Nagar-Kalyan highway
leopard hits motorcycle on Nagar-Kalyan highway
advertisement

नगर-कल्याण रोडवर बिबट्याचा धसका

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश सीताराम डोके हे घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. याच अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना लगेच आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशत

advertisement

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बिबट्याने धडक दिल्यानंतर तिथून पळ काढला. ही घटना पाहून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. विशेषतः ओतूर-जुन्नर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे प्रमाण वाढले असल्याने शेतकरी आणि रहिवासी भयभीत झालेले आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीला केला रामराम, 2 मित्रमैत्रिणीने सुरू केला यशस्वी फूड ब्रँड, कमाई तर पाहा
सर्व पहा

स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे. घडलेल्या घटनेनंतर वनविभागानेही घटनास्थळी तातडीने जाऊन परिस्थिती पाहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी या भागात सावधगिरी बाळगावी आणि रस्त्यावर विशेष काळजी घ्यावी असे सांगितले जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Leopard Attack : मोटारसायकलचा चक्काचूर, शेतकरी रक्तबंबाळ! नगर-कल्याण मार्गावर बिबट्याचा हल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल