एकाच रात्री तीन ट्रकमध्ये चोरी: पहिली घटना यवत येथील 'हॉटेल रॉन्ड ४५' समोर घडली. पनवेलहून टेंभुर्णीकडे निघालेले दोन ट्रकचालक नूर इस्लाम आणि राजू पाल, रात्री विश्रांतीसाठी हॉटेलच्या पार्किंगमध्ये थांबले होते. चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या दोन्ही ट्रकमधून ५६० लिटर डिझेल चोरले.
advertisement
दुसरी घटना सहजपूर हद्दीतील 'सिंधू पंजाबी ढाब्या'च्या पार्किंगमध्ये घडली. इथे उभा असलेला ट्रक चालक जाफर रहिम सुमरा यांच्या गाडीतूनही चोरट्यांनी २५० लिटर डिझेल काढून घेतले. सकाळी गाडी सुरू करताना डिझेल चोरी झाल्याचा प्रकार चालकांच्या लक्षात आला.
याप्रकरणी नूर मकबुल इस्लाम यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. महामार्गावर रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबणाऱ्या ट्रकचालकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. महामार्गावर डिझेल चोरी करणारी एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
