चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना मोलाचा सल्ला दिला. इथले विरोधक वैतागले आहेत,म्हणूनच ते अशा पद्धतीने बोलत आहेत. आपण आपलं काम शांतपणे करत राहावं,ते रागावले म्हणून आपण रागावू नये, असा सल्ला त्यांनी महेश लांडगे यांना दिला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण पिंपरी चिंचवडमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात काम केलं आहे ते काम जरी आपण सांगितलं तरी कुणाला बोलता येणार नाही. ज्याप्रकारे मागच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडने आपल्या मतदान केलं, त्यापेक्षा जास्त जागा या महापालिका निवडणुकीत निवडून येतील.
advertisement
धमकी देणाऱ्यांनाही मुख्यमंत्री फडणवीसांनी कडक शब्दांत इशारा
दरम्यान एस.आर.ए प्रकल्पात धमकी देणाऱ्यांनाही मुख्यमंत्री फडणवीसांनी कडक शब्दांत इशारा दिला.
धमकी देणाऱ्याला त्याची जागा दाखवायला पिंपरी-चिंचवड पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत,असं सांगत १६ तारखेनंतर या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
