पुणे: शिका, संघटित व्हा आण संघर्ष करा असं सांगणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पुणे शहराशी एक खास नातं आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात बाबासाहेबांचं दुसरं घर आहे. तळेगाव दाभाडेच्या या घरात त्यांचं 7 वर्षे वास्तव्य होतं. त्यामुळे येथील घर हे अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार आहे. 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेकजण याठिकाणी भेट देत असतात.
advertisement
महत्त्वाच्या घडामोडींचं साक्षीदार
पुण्यातील तळेगाव चाकण महामार्गाजवळ हरणेश्वर टेकडीच्या बाजुला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. सन 1949 ते 1956 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे येथे वास्तव्य होते. डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असणाऱ्या या निवासस्थानात अनुयायांना मोठी प्रेरणा मिळत असते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने या निवासस्थानाची देखभाल केली जाते, असे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे किसनजी थुल सांगतात.
मराठी शाळा उत्तम! महाराष्ट्रातल्या 'या' शाळेत 25 आदर्श शिक्षक, शहरातून येतात विद्यार्थी
बाबासाहेबांचा स्पर्श लाभलेल्या वस्तू या निवासस्थानात आहेत. डॉ. बाबासाहेब लेखनासाठी वापरत असलेला एक लाकडी टेबल आणि लाकडी कपाट आजही जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे. त्यांनी हा बंगला 26 नोव्हेंबर 1948 मध्ये खरेदी केल्याचे सांगितले जाते, याबाबत माहितीही थुल यांनी दिली.
विद्यार्थी करतात स्पर्धा परीक्षेची तयारी
या घराच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचे पुतळे आहेत. निवासस्थानाच्या आत जाताच डॉ. बाबासाहेबांच्या ओजस्वी विचारांचे अस्तित्व आजही या ठिकाणी जाणवते. निवासस्थानात गौतमबुद्धांची सुंदर शांत व मनमोहक अशी मूर्ती आहे. तसेच या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येतात. 'स्वर्णीम इतिहासाची साक्ष देणारं ' हे बाबासाहेबांचे सेकंड होम मानलं जातं. या घराचे स्ट्रक्चर नक्कीच तुम्हाला त्याच्या प्रेमात पाडेल. पुण्यात आल्यावर नक्कीच ही वास्तू सर्वांनी आवर्जून पहावी. इथं आल्यावर आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल, असेही थुल सांगतात.