मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. रोड शोदरम्यान कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. याच आतषबाजीदरम्यान उडालेल्या ठिणग्यांमुळे किंवा फटाक्यांच्या ठिणगीमुळे इमारतीवरील टॉवरला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर काही काळासाठी रोड शो थांबवण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि आग पूर्णपणे विझवण्यात आल्यानंतर रोड शो पुढे सुरू करण्यात आला. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.
advertisement
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून नेमकी आग कशामुळे लागली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आतषबाजी करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे सार्वजनिक कार्यक्रमांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
