TRENDING:

देवीचे अलंकार आणि मुखवटे घडवणारे रहीम शेख, 120 वर्षांपासून कधीही पडू दिला नाही खंड!

Last Updated:

पुण्याची संस्कृती, परंपरा आणि वारसा यामध्ये कारागिरीला एक वेगळं स्थान आहे. शहरातील रविवार पेठ ही अशा कारागिरांची ओळख जपणारी जागा मानली जाते. याच पेठेत गेल्या १२० वर्षांपासून सोन्याचे आणि चांदीचे देवी देवतांचे मुखवटे घडवत आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुण्याची संस्कृती, परंपरा आणि वारसा यामध्ये कारागिरीला एक वेगळं स्थान आहे. शहरातील रविवार पेठ ही अशा कारागिरांची ओळख जपणारी जागा मानली जाते. याच पेठेत गेल्या १२० वर्षांपासून सोन्याचे आणि चांदीचे दागिने घडवण्याचा व्यवसाय करीत आलेले आहेत.उस्मान गिल्डर यांची तिसरी पिढी अगदी मनोभावे गणपतीच्या आणि देवीचे सोन्याचे आणि चांदीचे मुखवटे आणि अलंकार घडवण्याचे काम करते. याबाबतचे अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना रहीम उस्मान शेख यांनी दिली.
advertisement

जालन्यात एक दिवसाच्या पावसाने व्यवसायिकांना रडवलं, लाखोंच्या मुद्देमालांचा...

सोने आणि चांदीच्या आभूषणांना मुलामा देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पिढीचे काम करीन उस्मान गिल्डर, हमीद उस्मान गिल्डर आणि रहीम उस्मान गिल्डर हे पाहत आहेत. या पेढी ची सुरुवात 1905 मध्ये हयात गिल्डर यांनी केली. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय केवळ दागिने तयार करण्यापुरता मर्यादित नाही, तर गणपती बाप्पा आणि देवींचे अलंकार तयार करण्यामध्येही गिल्डर कुटुंबाने आपला ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक अलंकार घडवताना त्यातील कलात्मकता आणि बारकावे यांना जपणे, तसेच त्याला झगमगाटी चकाकी देणे, ही त्यांची खासियत आहे.

advertisement

नवरात्रीमध्ये 9 दिवस, 9 रंगच का असतात? तुम्हाला माहितीये का खरं कारण?

गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात पुण्यातील अनेक मानाचे गणपती व देवींच्या मुर्तींची शोभा वाढवणारे अलंकार याच कुटुंबाच्या हातातून घडलेले आहेत. पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी दागिन्यांच्या कामामध्ये सातत्याने नव्या पिढीला सामील करून घेतले आहे. त्यामुळेच गिल्डर कुटुंबाच्या हातातील सोन्या-चांदीच्या अलंकारांना वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे. रहीम उस्मान शेख सांगतात, “आमचं काम हे फक्त व्यवसाय नाही, तर ही आमच्या पिढ्यांची परंपरा आहे. भक्तांच्या देवाला आम्ही बनवलेले अलंकार घालून त्याची शोभा वाढते, हेच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने समाधान आहे.”

advertisement

'पोलिस पाटील' पदासाठी बंपर भरती, शेवटची तारीख आली जवळ; लवकरात लवकर करा अर्ज

आजही रविवार पेठेत गिल्डर बंधूंची कारागिरी पाहण्यासाठी अनेक ग्राहक भेट  देतात. या कारागिरीला मिळणारा विश्वास आणि मान हेच या १२० वर्षांच्या प्रवासाचे खरे बळ आहे.

मराठी बातम्या/पुणे/
देवीचे अलंकार आणि मुखवटे घडवणारे रहीम शेख, 120 वर्षांपासून कधीही पडू दिला नाही खंड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल