TRENDING:

Pune Ganapati Visarjan : पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला कधी सुरुवात, मार्ग कोणते? पाहा संपूर्ण माहिती

Last Updated:

Pune Ganapati Visarjan Miravnuk 2025: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस प्रशासन, मंडळे आणि स्वयंसेवक यांच्यात समन्वय साधून वेळापत्रक आणि मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात पुणे शहर पोलिसांनी काटेकोर नियोजन केले असून, यावर्षी मिरवणूक एक तास आधी म्हणजे सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे. याआधी दरवर्षी मिरवणुकीचा प्रारंभ साडेदहा वाजता होत असे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, मानाचे पाचही गणपती दुपारी बारा वाजेपर्यंत बेलबाग चौक पार करतील, असे नियोजन केले गेले आहे. यामुळे मिरवणुकीला लागणारा वेळ कमी होईल आणि गर्दीचे नियोजन सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळ बेलबाग चौकातून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळ यांची मिरवणुकीत उपस्थिती राहील. या नियोजनामुळे मुख्य मिरवणुकीत अखंडीतपणा राहील आणि गर्दी व्यवस्थापनात मदत होईल.

advertisement

विसर्जनासाठी पोलिसांकडून मंडळांना मार्गदर्शक सूचना

मंडळांसाठी काही अटी आणि सूचना देखील पोलिसांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये विशेषतहा ढोल-ताशा पथकांना स्थिर वादनास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन ढोल पथकांना परवानगी दिली जाईल आणि एका पथकात 60 सदस्यांची मर्यादा ठेवली गेली आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणेबाबतही नियम घालण्यात आले आहेत. मिरवणुकीदरम्यान एकाच वेळी दोन ढोल पथकांना वादनाची परवानगी मिळणार नाही. तसेच, मुख्य मिरवणुकीत मंडळांमध्ये अंतर ठेवले जाणार नाही.

advertisement

विसर्जन मार्गावर इतर चौकातून प्रवेश करणे पूर्णपणे बंदीस्त असेल. ढोल-ताशा पथकांना लक्ष्मी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाई आणि देखावे साकारणाऱ्या मंडळांना सायंकाळी सातनंतर मिरवणुकीत प्रवेश मिळेल. सर्व मंडळांना बेलबाग चौकातूनच मिरवणुकीत सहभागी व्हावे लागेल, अशी अट घालण्यात आली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती टिळक चौक पार करेपर्यंत इतर कोणतेही मंडळ त्या ठिकाणी प्रवेश करणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

advertisement

या सर्व नियोजनाचा उद्देश म्हणजे विसर्जन सोहळा वेळेत, सुरक्षित आणि शिस्तबद्धरीत्या पार पाडणे हा आहे. गर्दीचे व्यवस्थापन, वाहतुकीची सोय आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. नागरिकांनीही पोलिसांनी घालून दिलेल्या सूचनांचे पालन करून विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा पुणेकरांना मिरवणुकीत रंगतदार देखावे, पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि दिव्य रोषणाईचा सोहळा पाहायला मिळणार आहे, मात्र तो शिस्तबद्ध आणि वेळेत पार पडावा यासाठी हे विशेष नियोजन करण्यात आले आहे.

advertisement

एकंदरीत, यंदाची विसर्जन मिरवणूक नेहमीपेक्षा एक तास आधी सुरू होणार असून, मानाच्या गणपतींच्या उपस्थितीत आणि विविध मंडळांच्या सहभागामुळे हा सोहळा आणखी दिमाखदार होणार आहे

पोलिसांचे वेळापत्रक

विसर्जन मिरवणुकीची सुरुवात शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी पूजा संपल्यानंतर साडेनऊ वाजता होणार आहे.

  • मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे मंडईतील टिळक पुतळा येथे आगमन होईल. पूजा झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होईल.
  • मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ सकाळी साडेदहा वाजता बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ करेल.
  • मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती मंडळाचा गणपती पूजा आणि आरती झाल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास मार्गस्थ होईल.
  • मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळ आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी बारापर्यंत बेलबाग चौकातून मार्गस्थ होतील.
  • दुपारी एकपर्यंत महापालिकेचे गणपती मंडळ आणि त्वष्टा कासार गणपती मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील.
  • दुपारी चारच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ बेलबाग चौकातून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहे.तर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील. मानाची मंडळे सायंकाळी सातपर्यंत बेलबाग चौकातून मार्गस्थ होतील.

मानाच्या मंडळांसह अन्य मंडळांनी वेळ पाळण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धपणे पार पडेल, तसेच मिरवणुकीचा समारोपही लवकर होईल.अमितेश कुमार पोलीस आयुक्त

मराठी बातम्या/पुणे/
Pune Ganapati Visarjan : पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला कधी सुरुवात, मार्ग कोणते? पाहा संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल