दिवगंत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या देखाव्याची संकल्पना मांडली होती. मुंबईतला लालबागचा राजा आणि पुण्यातला हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे गणपती देखावे देसाई गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. बाबू गेनू मंडळाचा त्यांचा 20 वर्षांपासून संबंध होता. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर ही जबाबदारी देसाई यांच्या टीमवर आली होती.
विसर्जनानंतर माती द्या आणि पुढच्या वर्षी बाप्पा घ्या! पुणेकरांची भन्नाट संकल्पना
advertisement
देसाई यांच्या टीमनं जवळपास 40 कलाकारांच्या मदतीनं या देखाव्याची निर्मिती केलीय. त्यासाठी त्यांना सुमारे अडीच महिने वेळ लागला. नितीन देसाई यांच्या संकल्पनेतील ही शेवटची कलाकृती होती. ही कलाकृती त्यांच्या परंपरेला साजेसी करण्याचं आव्हान होतं. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून ही कलाकृती तयार केलीय, अशी भावना देसाई यांचे निकटवर्तीय हेमंत भाटकर यांनी व्यक्त केली.
…तेव्हा पुजाऱ्यांनी लपवली होती मूर्ती; कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची न ऐकलेली गोष्ट Video
बाप्पाच्या सेवेसाठी आम्ही काम करतोय. नितीन देसाई असे पाऊल उचलतील याचा आयुष्यात कधी विचारही केला नव्हता. आज याप्रसंगी त्यांची फार आठवण येते.नितीन दादा यांच्या जाण्याचे दु:ख तर आहेच पण त्यांच्या शिकवणी नुसार कामाला महत्व देणं हे जास्त महत्वाचं असल्याचं भाटकर यांनी सांगितलं





