…तेव्हा पुजाऱ्यांनी लपवली होती मूर्ती; कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची न ऐकलेली गोष्ट Video

Last Updated:

अंबाबाई देवीची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यातून काढून पुजाऱ्यांनी घरी लपवून ठेवली होती.

+
News18

News18

कोल्हापूर, 26 सप्टेंबर : एखाद्या मंदिराचा गाभारा हा देवतेविना रिकामा असलेला कधीही कोणी पाहिला नसेल मात्र कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा गाभारा हा काही काळ असाच रिकामा होता. पण साधारण 308 वर्षांपूर्वी याच मंदिरात अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. या घटनेला जरी इतका काळ लोटला असला तरी हा दिवस कोल्हापूरकरांसाठी त्याचबरोबर ऐतिहासिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कोल्हापूर शहराला विशेष ओळख ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिरामुळेच मिळाली आहे. दरवर्षी हजारो लाखो भाविक या मंदिरात नतमस्तक होत असतात. पण या मंदिराच्या बाबतीतल्या काही गोष्टी अजूनही बऱ्याच जणांना पूर्णपणे ठाऊक नाही येत. त्यातीलच एक असणारी ही अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या पुनःप्राणप्रतिष्ठापनेची घटना आहे.
advertisement
का लपवून ठेवण्यात आली होती अंबाबाईची मूर्ती ?
कोल्हापूरच्या परिसरात इसवी सन 9 व्या शतकापासून ते 12 व्या शतकापर्यंत शिलाहारांची एक राजवट होती. तर त्यानंतर सिंघनदेव यादव यांची कारकीर्द होती. ही कारकीर्द म्हणजे कोल्हापूरचा सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात कोल्हापुरातील अनेक प्राचीन मंदिरे उभारण्यात आलेली आहेत. या काळात मंदिरांना राजाश्रय असल्यामुळे ही सर्व मंदिरे सुरक्षित होती. पण सिंघन देव कारकीर्दीनंतर आदिलशाही काळात सर्वत्र अस्थिर वातावरण होते. त्यावेळी करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरातील मूर्तीची सुरक्षा देखील धोक्यात आली होती. त्यामुळेच श्री अंबाबाई देवीची मूर्ती देखील मंदिराच्या गाभाऱ्यातून काढून पुजाऱ्यांनी घरी लपवून ठेवली होती. त्या मूर्तीची रोजची पूजाअर्चा त्याच लपवून ठेवलेल्या ठिकाणी केली जात असे.
advertisement
यादिवशी झाली देवीची पुनः प्रतिष्ठापना
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तर महाराणी ताराराणी यांनी पुढे करवीर संस्थानाची 1710 साली स्थापना केली. करवीर संस्थानच्या स्थापनेनंतर सर्वत्र परिस्थिती स्थिरस्थावर झाली. त्यावेळी देवी सरस्वती आणि महाकाली देवीची मूर्ती जरी मंदिरात असल्या तरी श्री अंबाबाई देवीचा गाभारा भक्तांना सुनासुना वाटू लागला. त्याच दरम्यान नरहर भट सावगावकर प्रधान यांना अंबाबाई देवीने स्वप्नात दर्शन देत मला स्वस्थानी बसण्याची इच्छा झाली आहे असे सांगितले.
advertisement
कोल्हापूरकरांची 'लय भारी' आरास, बाप्पांसाठी उभारला जयप्रभा स्टुडिओ
त्याकाळात दुसरे संभाजी महाराज यांची राजधानी पन्हाळगडावर होती. तिथे जाऊन सावगावकर यांनी अंबाबाईच्या मूर्तीविषयी छत्रपतींना सांगितले. तेव्हा करवीर छत्रपतींनी सिदोजीराजे गजेंद्रगडकर-घोरपडे सरकार यांना आदेश दिला. त्यानुसार सिदोजीराजेंनी दिनांक 26 सप्टेंबर 1715 रोजी या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पुनः प्रतिष्ठापना केली, अशी माहिती मंदिर आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे.
advertisement
26 सप्टेंबर हा दिवस इतिहास दिवस
या घटनेला जेव्हा 300 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा या घटनेची आठवण म्हणून कोल्हापुरात पहिल्यांदाच मोठा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. भारतीय इतिहास संकलन समिती कोल्हापूर यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. तर करवीर नगर वाचन मंदिर या ठिकाणी अंबाबाई देवीवर व्याख्यान ठेवण्यात आले होते. तसेच 26 सप्टेंबर हा दिवस इतिहास दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा भारतीय इतिहास संकलन समिती, कोल्हापूर यांनी सुरू केली होती.
advertisement
लालबागच्या राजाचं आहे कोल्हापूरकरांशी नातं, तुम्हाला माहितीय का 4 दशकांची परंपरा?
मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असणारी ही अंबाबाई देवीची मूर्ती साधारण अडीच फूट उंच आहे. मूर्तीच्या हातात म्हाळुंग, गदा, ढाल, पानपात्र मस्तकावर संयोनी लिंग आहे. सुंदर पद्धतीने साडी नेसवल्यानंतर विलोभनीय दिसणाऱ्या मूर्तीचा हा इतिहास देखील सर्वांना अचंबित करणाराच आहे.
मराठी बातम्या/Temples/
…तेव्हा पुजाऱ्यांनी लपवली होती मूर्ती; कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची न ऐकलेली गोष्ट Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement