कोकणातील गणेशोत्सव प्रसिद्ध असून मुंबईतून लाखो चाकरमानी या काळात गावी जातात. तसेच पुण्यात कामानिमित्त स्थायिक झालेले कोकणवासीय देखील गणेशोत्सवासाठी मूळ गावी जातात. त्यामुळे दरवर्षी एसटी महामंडळाकडून जादा बस सोडल्या जातात. तसेच रेल्वेकडून देखील विशेष गाड्यांची सोय केली जाते.
Pune Mumbai Train: मुंबईत पावसाचा कहर, पुणे - मुंबई दरम्यानच्या सगळ्या ट्रेन रद्द
advertisement
यंदा विमानाची जादा उड्डाणे
यंदा बस आणि विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले असले तरीही त्याचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे अनेक भक्त विमानाने जाण्याला पसंती दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर फ्लाय 91 ने जादा विमानसेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोहगाव विमानतळ येथून सिंधुदुर्गसाठी थेट विमानसेवा आहे. या मार्गावर 24, 29, 31 ऑगस्ट आणि 5 व 7 सप्टेंबर रोजी अतिरिक्त उड्डाणे चालवण्यात येणार आहेत.
