TRENDING:

ऊनी शॉल्स अन् हँडमेड ज्वेलरी, पुण्यात काश्मिरी वस्तूंचे भव्य प्रदर्शन, 100 रुपयांपासून करा खरेदी

Last Updated:

या प्रदर्शनात काश्मीरमधील पारंपरिक हस्तकला, पश्मीना आणि ऊनी शॉल्स, ड्रायफ्रूट्स, केशर, सजावटीच्या वस्तू, हँडमेड ज्वेलरी तसेच घरगुती वापराच्या अनेक वस्तू पाहायला मिळत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणेकरांसाठी एक अनोखी संधी उपलब्ध झाली असून काश्मीर थेट पुण्यात अवतरले आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध वस्तूंचे भव्य प्रदर्शन पुण्यातील बावधन परिसरात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात काश्मीरमधील पारंपरिक हस्तकला, पश्मीना आणि ऊनी शॉल्स, ड्रायफ्रूट्स, केशर, सजावटीच्या वस्तू, हँडमेड ज्वेलरी तसेच घरगुती वापराच्या अनेक वस्तू पाहायला मिळत आहेत. अवघ्या 100 रुपयांपासून ते लाखभर रुपयांपर्यंतच्या किमतीत वस्तू खरेदी करण्याची संधी येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनासाठी नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात आला असून, काश्मीरची संस्कृती, कला आणि परंपरा अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे.
advertisement

काश्मीरमधील विविध हँडमेड वस्तू पुणेकरांना एकाच छताखाली पाहायला मिळत आहेत. बावधन येथील आठवडी बाजार ग्राउंड, मेघ मल्हार रागा सोसायटीजवळील एलएमडी चौक येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात काश्मीरमधील नामवंत 17 ते 18 कारागिरांनी तयार केलेल्या शाल, गालिचे तसेच विविध पारंपरिक हस्तकला वस्तूंचा समावेश आहे. पारंपरिक काश्मिरी कलेचा अनुभव घेण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देत असून, प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

advertisement

जेजुरीत भंडाऱ्याऐवजी काठ्यांची उधळण! दुकानदार आणि भाविकांमध्ये तुफान राडा; धक्कादायक घटनेचे PHOTOS

100 रुपयांपासून ते लाखापर्यंत वस्तू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सांभाळ फूड व्यवसाय, मित्र-मैत्रिणीची जोडी ठरतेय हिट, कमाई तर पाहाच
सर्व पहा

या प्रदर्शनात 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या विविध वस्तू उपलब्ध आहेत. येथे काश्मीरमधील प्रसिद्ध शाली, आकर्षक ज्वेलरी, पारंपरिक आणि डिझायनर ड्रेसेस, तसेच सुंदर घरगुती सजावटीच्या वस्तू पाहायला मिळतात. याशिवाय काश्मिरी साड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, त्याचबरोबर इतर राज्यांतील साड्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यात बंगाली साड्या आणि राजस्थानी पारंपरिक साड्या विशेष आकर्षण ठरत आहेत. विविध किमतींमधील आणि वैविध्यपूर्ण वस्तूंमुळे हे प्रदर्शन नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
ऊनी शॉल्स अन् हँडमेड ज्वेलरी, पुण्यात काश्मिरी वस्तूंचे भव्य प्रदर्शन, 100 रुपयांपासून करा खरेदी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल