पुण्यातील या दुर्मिळ आजाराची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पुण्यात गुईवेल सिंड्रोम या आजाराचे 22 संशयित रूग्ण आढळले आहे. तीन ते चार हॉस्पिटलमध्ये 22 संशयित रुग्ण आढळले आहेत. या 22 रूग्णांपैकी 6 रूग्ण हे पुणे शहरातील आहेत, तर बाकी रुग्ण हे जिल्ह्यातील आहेत. हे रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते. या रुग्णांची तपासणी केली जात आहे. तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार अशी माहिती नीना बोराडे यांनी दिली आहे. तसेच या संशयित रूग्णांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. सॅम्पलमधून नेमका काय समोर येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
पुण्यात नवीन विषाणूचा शिरकाव, 22 संशयित आढळले, काय आहे नवीन आजार?
या वयोगटातील लोकांना होतो आजार
हा आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो. आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं. 12 ते 30 वयोगटातील लोकांना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचा कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. या आजारासाठी
वेगळी ट्रीटमेंट लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते तीच ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे लवकरात लवकर बरा होणारा हा आजार असल्याचे नीना बोराडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान आज या आजारा संदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत एक कमिटी तयार करण्यात येणार आहे. तसेच या सगळ्या संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर तोडगा काढणार आहोत, अशी माहिती नीना बोराडे यांनी दिली आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायुंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो.
नेमका आजार काय?
जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपाय मुंग्या येणे. या आजाराचे कारण सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले आहे. त्याचवेळी काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते.
ही आहेत लक्षणे
अंग दुखणे
चालताना तोल जाणे
चेहरा सूजने
चालताना व गिळताना त्रास होणे
हात-पाय लूळ पडणे