Guillain Barre Syndrome : दुर्मिळ आजाराची पु्ण्यात दहशत! पालिकेने बोलावली तातडीची बैठक, एक्सपर्ट घेणार आजाराचा शोध
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्यातील या दुर्मिळ आजाराची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पुण्यात गुईवेल सिंड्रोम या आजाराचे 22 संशयित रूग्ण आढळले आहे. तीन ते चार हॉस्पिटलमध्ये 22 संशयित रुग्ण आढळले आहेत.
Guillain Barre Syndrome, Pune : पुण्यात दुर्मिळ गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचा शिरकाव झाला आहे. आज जिल्ह्यात या आजाराचे 22 संशयित रूग्ण आढळून आले आहेत. यातील 6 रूग्ण हे पुणे शहरातील आहेत, तर इतर रूग्ण हे जिल्ह्यातील आहे.या आजाराने नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरवले आहे. दरम्यान ही बातमी समोर येताच पुणे महापालिकाही तडकाफडकी जागी झाली असून त्यांनी आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत हा आजार रोखण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.तसेच एक्सपर्ट टीम या आजाराचा शोध घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील या दुर्मिळ आजाराची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पुण्यात गुईवेल सिंड्रोम या आजाराचे 22 संशयित रूग्ण आढळले आहे. तीन ते चार हॉस्पिटलमध्ये 22 संशयित रुग्ण आढळले आहेत. या 22 रूग्णांपैकी 6 रूग्ण हे पुणे शहरातील आहेत, तर बाकी रुग्ण हे जिल्ह्यातील आहेत. हे रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते. या रुग्णांची तपासणी केली जात आहे. तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार अशी माहिती नीना बोराडे यांनी दिली आहे. तसेच या संशयित रूग्णांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. सॅम्पलमधून नेमका काय समोर येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
या वयोगटातील लोकांना होतो आजार
हा आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो. आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं. 12 ते 30 वयोगटातील लोकांना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचा कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. या आजारासाठी
advertisement
वेगळी ट्रीटमेंट लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते तीच ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे लवकरात लवकर बरा होणारा हा आजार असल्याचे नीना बोराडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान आज या आजारा संदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत एक कमिटी तयार करण्यात येणार आहे. तसेच या सगळ्या संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर तोडगा काढणार आहोत, अशी माहिती नीना बोराडे यांनी दिली आहे.
advertisement
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायुंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो.
नेमका आजार काय?
जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपाय मुंग्या येणे. या आजाराचे कारण सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले आहे. त्याचवेळी काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते.
advertisement
ही आहेत लक्षणे
अंग दुखणे
चालताना तोल जाणे
चेहरा सूजने
चालताना व गिळताना त्रास होणे
हात-पाय लूळ पडणे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Guillain Barre Syndrome : दुर्मिळ आजाराची पु्ण्यात दहशत! पालिकेने बोलावली तातडीची बैठक, एक्सपर्ट घेणार आजाराचा शोध