नेहरूनगरमधील एच. ए. कॉर्नर मैदानावर सुरू असलेल्या प्युअर सिल्क एक्स्पो प्रदर्शनाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचे आयोजन सदा पनवेल यांनी केले आहे. या प्रदर्शनात देशभरातील विविध राज्यांमधून आलेल्या व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला आहे. गुजरातची डबल इकत हस्तनिर्मित पटोला साडी, महाराष्ट्रातील पैठणी साड्या, पारंपरिक बनारसी जरी आणि भरतकाम केलेल्या साड्या, तसेच तंचोई सिल्क असे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. 500 पासून लाखो पर्यंतच्या साड्या उपलब्ध आहेत. देशभरातील कलाकार आणि व्यावसायिकांनी आपल्या खास वस्तूंसह येथे सहभाग नोंदवला आहे.
advertisement
भागलपूर येथील अनेक विणकरांनी लग्न हंगामासाठी खास कुर्ता-पायजमा, हस्तनिर्मित भागलपूर सिल्क मोदी जॅकेट अशी विविध उत्पादने येथे उपलब्ध करून दिली आहेत. हे प्रदर्शन 8 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून पुणेकरांना एका छताखाली देशातील विविध राज्यांतील वस्तू खरेदीची संधी मिळत आहे.





