पुणे जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. स्पर्धेदरम्यान सायकलचा वेग प्रचंड असल्याने मागून येणाऱ्या खेळाडूंना ब्रेक लावणे अशक्य झाले. त्यामुळे काही क्षणातच एकावर एक सायकलींचा खच पडला. यामध्ये अनेक खेळाडूंना गंभीर दुखापत झाली असून सायकलींचे अक्षरश: तुकडे झाले होते.
advertisement
शर्यत 23 मिनिटांसाठी थांबवण्यात आली
सायकलस्वारांचा अपघात झाल्यानंतर ठरलेल्या नियमावलीनुसार शर्यत 23 मिनिटांसाठी थांबवण्यात आली. खेळाडूंना ताफ्यातील वैद्यकीय पथकाद्वारे तातडीने प्रथमोपचार देण्यात आले आणि त्यांना त्यांच्या सायकली बदलण्याची परवानगी देण्यात आली. सायकलस्वार पुन्हा रस्त्यावर उतरून शर्यत पूर्ण केली. केवळ मलेशिया राष्ट्रीय संघाचा सायकलस्वार क्रमांक 161 अब्दुल हलिल मोहम्मद इझत हा शर्यत पूर्ण करू शकला नाही. मात्र, सायकलस्वार क्रमांक 191 एन्झो फुएन्टेस कॅपरोली आणि क्रमांक 195 मार्टी रियारा कॅसानोव्हा (दोघेही प्रो सायकलिंग स्टॅट्स संघाचे) यांनी सायकल बदलल्यानंतर आपली शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली.
कोणालाही गंभीर दुखापत नाही
मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा अपघात झाला मुळशीतील कोळवण रोडवरून सायकलपटू पुढे जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी 60 ते 70 किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही. आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटल्याने मागून येणारे खेळाडू एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही आणि कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही.
पुढील टप्प्यांचे वेळापत्रक कसे आहे?
पाच दिवसांच्या स्पर्धेत 35 देशांतील 171 आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी झाले असून, एकूण ४३७ किलोमीटरच्या या स्पर्धेमुळे पुण्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जागतिक स्तरावर दर्शन घडत आहे.
21 जानेवारी : टप्पा 2 – मराठा हेरिटेज सर्किट (105.3 किमी)
22 जानेवारी : टप्पा 3 – पश्चिम घाट प्रवेशद्वार (134 किमी)
23 जानेवारी : टप्पा 4 – पुणे प्राईड लूप (95 किमी)
हे ही वाचा :
